Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University : मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घैसास यांच्या ‘रेशीमगाठी’ या पुस्तकाचा समाविष्ट

गोमंतकीय जीवन, भाषा, संस्कृती याविषयी अधिक चांगली ओळख

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University : गोवा विद्यापीठातील मराठी विषयाचे सहायक प्राध्यापक, प्रा. चिन्मय मधू घैसास यांच्या ‘रेशीमगाठी’ या भाषांतरित पुस्तकाचा समावेश, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

२०१८ साली प्रकाशित झालेल्या या भाषांतरित ग्रंथात, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त शीला कोळंबकर, स्व. संजीव वेरेकर आणि मुकेश थळी यांच्या निवडक कोंकणी ललित निबंधांचा मराठी अनुवाद समाविष्ट आहे.

संशोधक प्रा. (डॉ.) विजया जयंत देव यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या अलीकडे झालेल्या बैठकीत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची निश्चिती करण्यात आली.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात भाषांतर या अभ्यासपत्रिकेत ‘रेशीमगाठी’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला.

आकाशवाणी पणजी केंद्राचे निवृत्त वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार मुकेश थळी यांच्या ‘मागीलदार’, ‘दिवे’, ‘रंग श्रावणाचे’, ‘स्पष्टतेतील स्पष्टता’ आणि ‘जीवनाचा रियाज’ या निबंधांचे भाषांतर प्रस्तुत पुस्तकात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तथा ख्यातनाम पत्रकार स्व. संजीव वेरेकर यांच्या ‘गावाकडे’,

‘खुबे’, ‘कुठे गेली ती प्रेमळ मने ?’, ‘सायकल’ आणि ‘व्यवस्था आणि अवस्था’ या निबंधांचा अनुवाद समाविष्ट आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त शीला कोळंबकर यांचे ‘गुलमोहर’, ‘छिमकणी’, ‘मिकी’, ‘कारवार : एक अनुभव’ आणि ‘लोणचे’ हे लेख या ग्रंथात भाषांतरित करण्यात आले आहेत.

गोमंतकीय जीवनाची ओळख

मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हे पुस्तक समाविष्ट झाल्याने गोव्याबाहेरील आणि विशेषत: मराठवाड्यातील मराठी वाचक आणि अभ्यासकांना गोमंतकीय जीवन, भाषा, संस्कृती याविषयी अधिक चांगली ओळख होईल तसेच मूळ भाषा आणि साहित्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होईल, अशी भावना श्री. मुकेश थळी यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT