Goa University Accident Dainik Gomantak
गोवा

Watch Video: गोवा विद्यापीठ मार्गावर अपघात, मालवाहू ट्रक झाला पलटी

मालवाहू ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला असून, ट्रकचा चक्काचूर झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University Accident: दोनापावला - बांबोळी मार्गावर रविवारी पहाटे मोठा अपघात झाला आहे. मालवाहू ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला असून, ट्रकचा चक्काचूर झाला आहे.

पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोनापावला - बांबोळी मार्गावर मणिपाल रूग्णालयाजवळ मालवाहू ट्रक पलटी झाला. ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून, ट्रक बाजुला हटविण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतरचा एक व्हिडिओ समोर आला असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, गोव्यातून उद्यापासून G20 शिखर परिषदेची पहिली बैठक सुरू होणार आहे. यासाठी विविध देशातील प्रतिनिधी गोव्यात दाखल होत आहेत. या प्रतिनिधीच्या प्रवासासाठी असणाऱ्या मार्गापैकी हा एक मार्ग असल्याची माहिती मिळतेय.

सध्या अपघातग्रस्त ट्रक बाजुला हटवण्यासाठी पोलिस आणि इतर यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Mapusa: बार्देश प्रशासकीय संकुलाची दुर्दशा! नाक मुठीत धरून करावी लागते ये-जा; पार्किंगची समस्याही जटील

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT