Olencio Simos Dainik Gomantak
गोवा

गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनने कामगार दिन केला साजरा

गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनचे अध्यक्ष ओलेन्सिओ सिमोस यांनी दिल्या शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

वास्को : गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनचे अध्यक्ष ओलेन्सिओ सिमोस यांनी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये साजरा होणाऱ्या कामगार दिन अर्थात एक मे दिनानिमित्त गोव्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनने वेलसाव येथे आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला. (Goa United Workers Union celebrates Labor Day )

या कार्यक्रमावेळी शेवटची वेतनवाढ दशकापूर्वी केली गेली होती. त्याप्रमाणे अकुशल, कुशल,उच्च कुशल आणि लिपिक यांच्या संबंधित श्रेणींमध्ये किमान वेतन दुप्पट केले जावे असा ठराव मांडण्यात आला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या गोव्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे केवळ वैयक्तिक किंवा कंपन्यांच्या फायद्यासाठी जास्त शोषण होत असल्याचे ओलेन्सिओ यांनी नमूद केले.

परंतु कंपन्यांमध्ये मूलभूत सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छताविषयक मान प्रदान करण्यात अपयशी ठरतात. कोविड महामारीमुळे कामगार वर्ग विशेषत: धोकादायक कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांचे प्रचंड हाल झाले आहेत. परंतु तरीही आमच्या कामगारांनी गोव्यात कंपन्या तरंगत ठेवण्यासाठी अथक जोखीम पत्करून आणि जीव गमावूनही काम केले असे सिमोईश शेवटी म्हणाले.

अरुण गालवे म्हणाले की, सरकारने प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोग लागू केला आहे, जिथे त्यांचे पगार जवळपास दुप्पट झाले आहेत, तर फक्त आमच्या मजुरांना किंवा कर्मचार्‍यांनाच का त्रास सहन करावा लागतो असे ते म्हणाले. गोवा युनायटेड वर्कमेन युनियनने किमान १० वर्षात किमान वेतन दुप्पट करण्याची मागणी केली आहे सध्याची महागाई पाहता गोव्यात कच्च्या तेल, गॅस, किराणा माल इत्यादींच्या उच्च दरामुळे जगणे कठीण होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT