Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: स्थानिकांची घरे वाचवा! कुंकळ्ळी बायपाससाठी निधी मंजूर झाल्यानंतर युरी आलेमाव यांची गडकरींना विनंती

Yuri Alemao: कुंकळ्ळी बायपाससाठी 310 कोटी निधी मंजूर

Ganeshprasad Gogate

Yuri Alemao: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुंकळ्ळी बायपाससाठी ₹310.92 कोटी मंजूर करण्याची घोषणा केली असून या घोषणेचे विरोधी पक्षाकडून स्वागत करण्यात आले आहे.

याच संदर्भात विरोधी पक्ष नेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी या संदर्भात सोशल मिडीयावर गडकरींच्या घोषणेचे स्वागत करत गडकरींना एक विनंती केली आहे.

आलेमाव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला आवाहन करतो की नियोजित बायपासच्या कामामुळे येथील स्थानिकांच्या घराचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच येथील पर्यावरणाची कोणतीही मोठी हानी होणार नाही याची दखल घेणे महत्वाचे आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कुंकळ्ळी येथील वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या आहे. मुख्य बाजारपेठेतून अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने बाजारपेठेत येणाऱ्यांना मोठा धोका निर्माण होत आहे.

सध्याच्या महामार्गापासून काही मीटर अंतरावर शाळा असून वाहनांच्या रहदारीमुळे शालेय मुलांनाही अपघाताचा धोका संभवेल अशी शक्यता युरी आलेमाव यांनी वर्तवली आहे.

मला आशा आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रस्ते वाहतूक मंत्रालय स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊनच बायपासचे स्ट्रक्चर तयार करतील.

तसेच या बायपासमुळे स्थानिकांच्या घरांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची मी काळजी मी घेईन, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊनच दांडेवाडो ते उसकिणी आर्क या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हातात घ्यावे. सदर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरांना कोणताही धोका होता कामा नये याची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

बायपास तसेच महामार्ग विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेवर मी बारकाईने लक्ष ठेवीन आणि स्थानिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेईन, असे आश्वासन युरी आलेमाव यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT