Goa : Ghost Plateau awaiting industrial project in Priyol Constituency. Dainik Gomantak
गोवा

Goa : प्रियोळ मतदारसंघात बेरोजगारीचा यक्षप्रश्‍न

Goa : प्रदूषणविरहीत प्रकल्‍पांद्वारे रोजगारसंधी द्यावी

Mahesh Tandel

सावईवेरे : प्रियोळ मतदारसंघात (Priyol Constitunecy) आज बेरोजगारीचा (Employment) प्रश्‍न मोठा आहे. मतदारसंघात वीज, पाणी पुरवठ्यासह अन्य समस्याही आहेत. एखादा विकासप्रकल्प साकारायचा म्हटले, तरी त्यावरून वाद उद्‍भवतात आणि मग विकासापासून वंचित राहावे लागते. आजवर राजकीय स्पर्धेतून या मतदारसंघाच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे.

गोवा मुक्तीनंतर गोव्यात सार्वजनिक निवडणुका होऊ लागल्या. १९६३ मध्ये पहिली निवडणूक झाली, यावेळी गोव्यात २८ व दीव आणि दमणमध्ये प्रत्येकवेळी एक मतदारसंघ मिळून एकूण तीस मतदारसंघ होते. यात मडकई हा मतदारसंघ गोव्यात सुप्रसिद्ध होता. १९८६ मध्ये गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाला व दीव-दमण वगळता गोव्यात एकूण चाळीस मतदारसंघ बनले. मतदारसंघाच्या पुन्‍हा केलेल्‍या रचनेनुसार मडकई मतदारसंघातील तिवरे-वरगाव बेतकी-खांडोळा, वेरे-वाघुर्मे, वळवई, केरी, वेलिंग-प्रियोळ व भोम या सात पंचायतींचा समावेश असलेला प्रियोळ हा नवीन मतदारसंघ बनविण्यात आला. त्यावेळी या मतदारसंघातून १९८९ व १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. काशिनाथ जल्मी, १९९९ व २००२ च्या निवडणुकीत ॲड. विश्वास सतरकर, २००७ व २०१२ च्या निवडणुकीत दीपक ढवळीकर तर २०१७ च्या निवडणुकीत गोविंद गावडे हे निवडून आले आहेत.

बेरोजगारी वाढली
१९८९ मध्ये व त्यानंतर दहा वर्षांत भूतखांब पठारावर दोन प्रकल्प येणार होते. पण, ते दोन्ही प्रकल्प प्रदूषणकारी ठरणार असल्याच्या कारणास्तव स्‍थानिकांकडून त्‍यांना तीव्र विरोध करण्यात आला व दोन्ही प्रकल्प या भागांतून हद्दपार झाले. भूतखांब पठारावर एक तर प्रदूषणविरहित प्रकल्प आणावेत किंवा तिथे औद्योगिक वसाहत स्थापन करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. पण, गेल्या तीस वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने कोणताही सकारात्‍मक प्रयत्न केलाच नाही. ॲड. विश्‍वास सतरकर यांनी सात वर्षे, दीपक ढवळीकर यांनी दहा तर गोविंद गावडे यांनी साडेचार वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तिघेही सरकारात असूनही त्यांना यासंबंधी काहीच करता आले नाही.

आश्‍वासनांना हरताळ
निवडणूक पूर्व काळात जाहीरनामे किंवा वचननामे जाहीर केले जातात, पण निवडणूक झाल्यानंतर ते बासनात गुंडाळून ठेवले जातात. प्रियोळ मतदारसंघात एकूण ३०४५० मतदार असूनही प्रत्येक वेळी मतदारसंघाबाहेरचा उमेदवार लादला जातो, हीच खरी या मतदारसंघातील शोकांतिका आहे.

प्रकल्‍प आणि वाद!
२००७ ते २०१७ या दहा वर्षांत दीपक ढवळीकर यांनी या मतदारसंघात बरीच विकासकामे केली. कुळागरी व अत्यंत अडचणीच्या भागात बरेच रस्ते केले. विजेची व पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रयत्न केले. माशेल बस स्टॅंड, बाणस्तारी बाजार प्रकल्प या कामांचा प्रारंभ केला, पण आज ते प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

म्‍हादई नदीवर पूल हवा
गोविंद गावडे यांनी पाणीपुरवठ्याबरोबरच प्राथमिक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण करण्याची कामे हाती घेतली आहेत. मतदारसंघात असलेल्या एकमेव सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावले आहे. प्रत्‍येक लोकप्रतिनिधीने बरीच कामे मार्गी लावली असली, तरी बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. तसेच म्हादई नदीवर सावईवेरे किंवा वळवई भागात पूल बांधण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. असा एखादा मोठा प्रकल्प हाती घेऊन तो मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला नसल्याची खंत येथील मतदारांची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT