Goa Turist Taxi Digital Mitter Dainik Gomantak
गोवा

Goa:डिजिटल मीटरचा घोळ सुरूच

राज्यभरातील काम बंद : तांत्रिक बदल करावे लागणार

Dhananjay Patil

पणजी : (Goa) वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो (Transport Minister) यांनी डिजिटल मीटरचे निम्मे शुल्क सरकार भरेल, अशी केलेली घोषणा आणि टॅक्सी दरवाढ यामुळे डिजिटल मीटर बसवण्याचे काम ठप्प झाले आहे. राज्यभरात आज (शनिवारी) डिजिटल मीटर बसवण्याचे काम बंद होते. डिजिटल मीटर (Digital Mitter) बसवले नाही तर परवाने रद्द करू, असा इशारा सरकारने दिला. त्यानंतर मीटर बसवण्यासाठी मुदतवाढ दिली तरी डिजिटल मीटर बसवण्याकडे टॅक्सीमालकांनी फिरवलेली पाठ आजही कायम होती. पर्वरी, वास्को, फातोर्डा येथील डिजिटल मीटर बसवण्याच्या केंद्राकडून‌ मिळालेल्या माहितीनुसार एकही मीटर आज बसवण्यात आले नाही. सरकारने टॅक्सी दरवाढ केल्याने मीटरमध्ये काही तांत्रिक बदल करावे लागतात. ते केल्यावर ते वैध मापनशास्त्र खात्याकडून प्रमाणित करून‌ घ्यावे लागतात.

त्यात या केंद्रचालकांचा वेळ खर्ची पडला. त्यातच मीटरचे (Digital Mitter) निम्मे शुल्क सरकार भरेल, (Goa Govt) अशी घोषणा करण्यात आली. त्याविषयी लेखी आदेश या केंद्रांना न मिळाल्याने त्या पातळीवरही संभ्रम आहे. या साऱ्याचा फटका डिजिटल मीटर बसवण्याच्या कामाला बसला आहे. काळी- पिवळी टॅक्सी (Taxi) परवानाधारक डिजिटल मीटर बसवण्यास तयार झाल्याने मीटरला होणारा विरोध‌ बोथट होऊ लागला आहे. सरकारने डिजिटल मीटरचे निम्मे शुल्क भरण्याचे ठरवले आहे. त्याविषयीचा आदेश लवकरच जारी केला जाईल. मीटर बसवले नाही म्हणून‌ परवाने रद्द करा असे सरकार लगेच करणार नाही. मात्र, कारवाई टाळण्यासाठी १५ दिवसांत कार्यवाहीची हमी टॅक्सी परवानाधारकाला द्यावी लागेल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT