Goa Accident's Dainik Gomantak
गोवा

Goa Accident's: हे तर उशीरा सुचलेलं शहाणपण

बागा येथे छाटणी केली म्हणून गेलेले दोन जीव परत थोडेच येणार

दैनिक गोमन्तक

सोमवारी पहाटे बागा खाडीत झालेल्या अपघातानंतर (Goa Accidents) त्या रस्त्यावर आलेली झुडुपे कापून स्थानिक ग्रांमपंचायतीने तो भाग स्वच्छ केला. म्हणजेच एका अर्थाने ते उशिरा सुचलेले शहाणपणच आहे. पंचायती वा जिल्हा पंचायतींकडे तसे पाहिले तर विशेष काम नसतो की फंडही नसतो. रस्त्यांच्या बाजूचा भाग स्वच्छ करण्याचे काम साबांखाचे असते. पण, त्या खात्यांतील अंतर्गत सूत्रांच्या माहितीप्रमाणे अशा कामात वरवरची कमाई होत नाही म्हणून अशी कामे हातीच घेतली जात नाहीत. बहुतेक सर्व रस्त्यांच्या कडांनी वाढलेली झाडेच त्याची साक्ष आहेत. आता बागा येथे छाटणी केली म्हणून गेलेले दोन जीव परत थोडेच येणार...

गोव्यात एका आठवड्यात 7 अपघात

पुण्यातील शुभम देडगे तसेच ईश्वरी देशपांडे हे युगुल गेल्या बुधवारपासून गोव्यात होते. रविवारी बागा-कळंगुट येथील रात्रीची पार्टी संपवून हणजुणच्या दिशेने भरधाव वेगात ते कारने जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला.

गोव्यातून बेळगावला जाणाऱ्या चोर्ला घाट मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. काल पहाटे गोवा-कर्नाटक सीमा परिसरातील गोव्याच्या हद्दीत मालवाहू ट्रक( KA 01 D 8670) कलंडल्याने अपघात मोठा झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने ट्रक चालक शिवकुमार नालगुडी( 30) व क्लीनर शिवाप्पा हिंचल दोघेही सुखरूप आहे.

गोवा पर्यटनासाठी आलेले हैदराबादचे चारजण काल झालेल्या अपघातात जबर जखमी झाले. बेतोडा-बोरी बगलमार्गावर कार व टिप्पर यांच्यात मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास धडक झाली आणि ही घटना घडली. जखमींना त्वरित फोंडा उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले.

गोव्यात रविवारी मध्यरात्रीपासून एकामोगामाग बांबोळी, हडफडे, केरी, आगोंद व होंडा फोंडा, आणि आता चोर्ला घाटातही अशा सात ते आठ वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सोमवारी झालेल्या चार अपघातांमध्ये एका पोलिसासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रीयन पर्यटकांचाही समावेश होता. त्याचबरोबर बांबोळी आणि हडफडे येथे मोठे भीषण अपघात झाले. त्यामुळे या आठवड्यातील सोमवार हा घातवार दिवस ठरला. आणि त्या अपघातातून गोवा आणि महाराष्ट्र सावरत नाही तर गोवा पर्यटनासाठी आलेले हैदराबादचे चारजण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. आणि काल बेळगावला कडबा घेवून जाणाऱ्या ट्रकचा पुन्हा अपघात झाला.

रस्त्यावर आलेली झुडुपे कापून स्थानिक ग्रांमपंचायतीने आता रस्ते स्वच्छ करायला सुरवात केली. म्हणजेच एका अर्थाने हे उशिरा सुचलेले शहाणपणच आहे असे म्हणावे लागले. पंचायती वा जिल्हा पंचायतींकडे तसे पाहिले तर विशेष कामाचा ताप नसतो आणि फंडही नसतो. पण, या खात्यांतील अंतर्गत सूत्रांच्या माहितीप्रमाणे अशा कामात वरवरची कमाई होत नाही म्हणून अशी कामे हातीच घेतली जात नाहीत, असे निदर्शानास आले. बहुतेक सर्व रस्त्यांच्या कडांनी वाढलेली झाडेच या कामाची साक्ष देत आहेत. आता बागा रस्त्यावर झाडांची छाटणी केली म्हणून गेलेले दोन जीव परत थोडेच येणार...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT