Photo session at Bhuipal Madhyamik Vidyalaya during Plantation program, on friday, 16 July, 2021(Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: भुईपाल माध्यमिक विद्यालयात वनमोहत्सावा निमित्त वृक्षारोपण

पर्यावरणाचा (Environment) समतोल राखण्यासाठी झाडे लावणे (Tree Plantation) तसेच ती जागवण्याविषयी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस यांनी उपस्थितांना केले.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: होंडा (Honda) पंचायतीच्या भुईपाल (Bhuipal) प्रभागात येणाऱ्या सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या (Secondary school) आवारात वाळपई वन खात्याच्या (forest department) सहकार्याने वनमोहत्साव (Forest festival) साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवर तसेच गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांची लागवड (Tree Plantation) करण्यात आली. सदर कार्यक्रमास भुईपाल गावातील दोन्ही पंच सया पावणे, पांडुरंग गावकर, मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस, शिक्षक वर्ग तसेच वन खात्याच्या वतीने वनविभागाच्या अधिकाऱी विश्वनाथ पिंगुळकर यांच्यासह इतर वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस हीने उपस्थितांचे स्वागत करून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून ती जगवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात झाडे लावणे गरजेचे आहे, वाळपई वन खात्याच्या वतीने सदर कार्यक्रम भुईपाल विद्यालयात राबविण्यात आल्याने खात्यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT