पणजी: गोवा हे भारतातील तसंच परदेशातील पर्यटकांचं लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. कोणी नैसर्गिक सौंदर्यासाठी, कोणी बीचवर मजा करण्यासाठी, तर कोणी स्वादिष्ट अन्न आणि खास पेयासाठी. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातुन गोव्यातील प्रसिध्द पदार्थ, सर्वोत्तम पर्यटन स्थळ, सहलीचा खर्च, प्रसिद्ध पेये आणि गोवा फिरण्यासाठी कोणता महिना स्वस्त ठरेल याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
गोव्यातील खाद्यसंस्कृती ही इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. गोव्यातील खाद्यपदार्थांमध्ये मासे, नारळ, भात, मसाले आणि कडधान्यांना वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
फिश करी - फिश करी राईस हे गोव्याचे पारंपरिक जेवण आहे. फिश करीसाठी कोळंबी (प्रॉन्स), सुरमई किंवा बांगडा मासा वापरला जातो.
विंडालू - गोव्यातील पारंपरिक आणि पोर्तुगीज प्रभाव असलेली एक झणझणीत डिश पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरते ती म्हणजे 'विंडालू'. विंडालू हा मटणाचा प्रकार असून लसूण, तिखट मसाला आणि सुगंधी मसाल्यांचे मिश्रण असते.
बिबिंका - बिबिंका हा अंडी, साखर आणि खोबऱ्याच्या दुधापासून तयार केलेला पारंपरिक गोवन गोड पदार्थ. गोव्यात सण, उत्सव आणि खास प्रसंगी बिबिंका हा पदार्थ हमखास पाहायला मिळतो. विशेषतः ख्रिसमसच्या काळात हा पदार्थ घराघरात बनवला जातो.
गोव्यातील स्ट्रीट फूड म्हणजे एक वेगळीच चव अनुभवण्यासारखी आहे. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना फ्रँकी, रॉस ऑम्लेट पावचा आनंद घेता येतो.
गोवा राज्य हे उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोवा (South Goa) अशा दोन जिल्ह्यात राज्याची विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांत फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.
उत्तर गोवा (North Goa) हे पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षक ठिकाण मानलं जातं. येथे बागा, कळंगुट, वागातोर आणि हणजूणसारखे प्रसिद्ध किनारे पर्यटकांना भुरळ घालतात. समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य, वॉटर स्पोर्ट्स आणि बीच पार्टीजमुळे हा भाग विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
टीटोज्, मॅम्बो, शॅकल्स यांसारखे प्रसिद्ध नाईट क्लब्स उत्तर गोव्यात पाहायला मिळतात. याशिवाय, हणजूण आणि म्हापसा येथील मार्केट्समध्ये पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. येते स्वस्त दरात स्थानिक वस्तू खरेदी करता येतात
शांतता, निसर्गसौंदर्य आणि निवांत वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर दक्षिण गोवा हा उत्तम पर्याय ठरतो. उत्तर गोव्याच्या तुलनेत तुलनेत कमी गर्दीचा आणि अधिक शांत परिसर असलेला हा भाग सध्या कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
दक्षिण गोव्यात पोळोळे, बाणावली, सिक्वेरी यांसारखे शांत किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांसाठी दक्षिण गोव्यात अनेक उच्च दर्जाची रिसॉर्ट्स आणि आरामदायक हॉटेल्स उपलब्ध आहेत. याठिकाणी खासगी व्हिला, पूलसह रिसॉर्ट्स असलेली ठिकाणंही मोठ्या प्रमाणात आहेत.
गोव्याची सहल बजेटनुसार महाग किंवा स्वस्त होऊ शकते. साधारणतः प्रवाशांसाठी राहणं, जेवण, वाहन भाडे आणि वॉटर स्पोर्ट्ससह एकूण खर्च अंदाजे ६ हजार ते ९ हजार दरम्यान येतो. तर लक्झरी प्रवाशांसाठी, उच्च दर्जाचे रिसॉर्ट्स, खासगी वाहन आणि पॅकेज टूरसह खर्च अंदाजे ३० हजार रूपयांपेक्षा जास्त होऊ शकतो.
सण, शनिवार-रविवार किंवा पीक सीझनमध्ये दर वाढण्याची शक्यता असल्यामुळं सहलीचे नियोजन आधीच करणं फायदेशीर ठरतं.
गोवा म्हटलं की येथील स्थानिक पेयांचीही चर्चा रंगते. गोव्याची पारंपरिक फेणी ही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. काजू पासून बनवली जाणारी ही स्थानिक मद्यप्रकार गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग मानली जाते. अनेक पर्यटक खास फेणीचा आस्वाद घेण्यासाठी गोवा फिरायला जातात. फेणीप्रमाणेच हुर्राक हे अजून एक स्थानिक पेय उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरतं.
याशिवाय, गोव्याची आणखी एक खासियत म्हणजे सोलकढी. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवली जाणारी ही थंड आणि आरोग्यदायी पेयप्रकार खास करून जेवणानंतर घेतली जाते.
गोवा राज्य पर्यटकांना विशेष आकर्षित करतो त्यामागे आणखी एक कारण म्हणजे येथे दारूवर लागू होणारे कमी कर. त्यामुळेच इथली दारू तुलनेने स्वस्त असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे एक अतिरिक्त आकर्षण ठरत आहे.
गोवा सहलीसाठी सर्वात स्वस्त आणि कमी गर्दीचा काळ म्हणजे जून ते सप्टेंबर. या काळात गोवा ऑफ-सीझनमध्ये असल्यामुळे हॉटेल्स, फ्लाइट्स आणि टूर पॅकेजेस यांचे दर प्रमाणात कमी होतात.
जून ते सप्टेंबर या काळ पावसाचा असतो, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स, बोटिंगसारख्या साहसी खेळांवर निर्बंध घातले जातात. याच कारणामुळे या काळात पर्यटकांची गर्दी तुलनेने फारच कमी असते. त्यामुळे अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स ३०% ते ५०% पर्यंत सवलत देतात. कमी खर्चात गोवा फिरायचं असल्यास जून ते सप्टेंबर. या काळ बेस्ट पर्याय ठरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.