Scam in Vehicle on Rent in goa Dainik Gomantak
गोवा

Rental Vehicle in Goa: खाजगी वाहने भाड्याने देणाऱ्यांवर होणार कारवाई; वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांची माहिती

वाहने भाड्याने देण्यामध्ये अनेक गैरप्रकार

Kavya Powar

Scam in Vehicle on Rent in Goa: गोव्यात येणारे बहुतांशी पर्यटक हे फिरण्यासाठी वाहने भाड्याने घेतात. यामध्ये अनेक गैरप्रकार आजवर उघड झाले आहेत. याबाबत वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकजण आपली खाजगी वाहने पर्यटकांना भाड्याने देत असल्याचे उघडकीस आले आहे.

ते म्हणाले की, पर्यटकांना भाडेतत्वावर दिल्या जाणाऱ्या वाहनांना विशिष्ट नंबर प्लेट असते. त्यांनाच वाहने देण्यास परवानगी आहे. मात्र अनेकजण आपली खाजगी वाहने भाड्याने देत आहेत.

असे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक विभागातर्फे मोहीम सुरू करण्यात आली असून असे करणाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे.

दरम्यान, अक्षत कौशल पुढे म्हणाले की, राज्यात येणाऱ्या पर्यटकांनीही याबाबत खबरदारी बाळगावी. कोणतीही वाहने भाड्याने घेण्यापूर्वी वाहनाचे संपूर्ण कागदपत्र, नोंदणी तपासून घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT