Goa Traffic Police Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police Accident: कार अपघातात पोलिस ठार; पाच कर्मचारी गंभीर

देवदर्शनाहून परतताना लोलये येथे काळाचा घाला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Traffic Police Accident: मडगाव - कारवार हमरस्त्यावर शेळी-लोलये येथे सोमवारी पहाटे मासेवाहू कंटेनर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील हणजुणे ट्रॅफिक सेलचे पोलिस शिपाई राकेश विर्नोडकर यांचा मृत्यू झाला, तर इतर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले.

जीए - 11 - ए - 1805 या कारने मुर्डेश्वर - कर्नाटक येथून देवदर्शन घेऊन परतताना समोरून येणाऱ्या एमएच - 08 - डब्ल्यू - 8170 या मासेवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिली.

त्यात राकेश विर्नोडकर यांचा मृत्यू झाला, तर कालिदास शेट्ये (आगरवाडा-पेडणे), कृष्णा पालयेकर (पालये - पेडणे), राकेश विरेंदर (शिवोली), प्रितेश मांद्रेकर (हरमल), राजेश पटेकर (मांद्रे) हे पाच पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिस कॉन्स्टेबल राकेश विर्नोडकर यांची हल्लीच हणजूण वाहतूक पोलिस स्थानकावरून पणजीला बदली झाली होती, परंतु अद्याप त्यांना हणजूण पोलिस स्थानकातून मुक्त करण्यात आले नव्हते.

पहाटेच मृत्यूने गाठले!

मडगाव- कारवार हमरस्त्यावर सोमवारी पहाटे ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या ठिकाणी तीव्र वळण आहे. मासेवाहू कंटेनर मडगावहून कारवारच्या दिशेने जात होता, तर कार कारवारहून मडगावच्या दिशेने येत असताना या वळणावर त्यांच्यात अपघात झाला.

पहाटे 2.45 च्या सुमारास राकेश विर्नोडकर यांना मृत्यूने गाठले. राकेश विर्नोडकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच सडये-शिवोलीत शोककळा पसरली. मित्र परिवार, नातेवाईकांत धावपळ उडाली.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : राकेश विर्नोडकर यांच्या मृतदेहावर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता सडये येथील स्थानिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर, सडयेचे सरपंच दीपा पेडणेकर, सर्व पंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागझर, बांबोळीतही अपघात

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी मिळविण्यासाठी सुसाट टॅक्सी हाकण्याच्या प्रयत्नात आज पहाटे 5.45 वाजता नागझर येथे दोन टॅक्सी एकमेकांना धडकल्या. दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागाचे नुकसान झाले.

दुसरीकडे, बांबोळी येथील जीएमसी परिसरात कार आणि स्कुटर यांच्यात अपघात झाला. या अपघातातील जखमी झालेल्या साखळी येथील विद्यार्थ्यीनीला गोमेकॉत दाखल करण्यात आले.

शिवोली गावावर शोककळा

लोलयेतील अपघातात मृत पावलेले राकेश विर्नोडकर गेली अनेक वर्षे पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. तसेच मित्र परिवार आणि समाजात त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सगळ्यांच्याच परिचयाचे होते.

त्यांच्या अचानक झालेल्या या मृत्यूमुळे शिवोली गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्यामागे पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, सहा भाऊ, भावजयी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT