Goa Police Checking Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे अल्कोमीटर यंत्रेच नाहीत; अर्ध्याहून जास्त अल्कोमीटर नादुरुस्त!

एका वर्षापूर्वी हे अल्कोमीटर पुरवठा करण्यासाठी पोलिसांकडून प्रस्ताव सरकारकडे गेला होता. त्याला सरकारने मंजुरीही दिली आहे. मात्र, निधीअभावी हा प्रस्ताव अजूनही पडून राहिलेला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: वाहतूक पोलिसांकडे असलेल्या चालू स्थितीतील अल्कोमीटरची संख्या कमी आहे. त्यांच्याकडे असलेल्या एकूण अल्कोमीटरपैकी अर्ध्याहून जास्त नादुरुस्त आहेत. एका वर्षापूर्वी हे अल्कोमीटर पुरवठा करण्यासाठी पोलिसांकडून प्रस्ताव सरकारकडे गेला होता. त्याला सरकारने मंजुरीही दिली आहे. मात्र, निधीअभावी हा प्रस्ताव अजूनही पडून राहिलेला आहे.

(goa traffic police have a non working alcometer)

रात्रीच्यावेळी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयाकडून वारंवार निर्देश दिले जात आहेत. मात्र, कारवाई करण्यासाठी अल्कोमीटर यंत्रेच नाहीत. न्यायालयाच्या रोषाला मात्र पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. एका वाहतूक पोलिस कक्षाला किमान पाच तरी अल्कोमीटर असणे आवश्‍यक आहे. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अल्कोमीटर नसल्याने त्यांना सोडून देण्याची पाळी येते. अल्कोमीटरने मद्यपी वाहनचालकांची चाचणी करताना ते बंद पडतात. याचे खापर मात्र पोलिसांवर फोडले जाते, असे मत एका वाहतूक पोलिसाने व्यक्त केले.

अनेक नादुरुस्त

प्रत्येक वाहतूक पोलिस कक्षाकडे एक किंवा दोन अल्कोमीटर आहेत. मात्र, वारंवार ते नादुरुस्त होतात. ज्या कंपनीचे हे अल्कोमीटर आहेत त्याची गॅरंटी मुदत संपली आहे. तसेच हे अल्कोमीटर कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे ते दुरुस्ती करण्याच्या पलिकडे आहेत, असे कंपनीने पोलिस खात्याला सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT