E Challan Fraud Alert Dainik Gomantak
गोवा

E Challan Fraud Alert: ई-चलन भरताना सावधान! बनावट लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत पोर्टलची खात्री करा

E Challan Payment Cyber Fraud: बनावट ई-चलन संकेतस्थळ आणि पडताळणी न केलेल्या पेमेंट लिंक्सद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बनावट ई-चलन संकेतस्थळ आणि पडताळणी न केलेल्या पेमेंट लिंक्सद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रॅफिक चलनची पडताळणी करावी आणि केवळ अधिकृत सरकारी पोर्टल्स किंवा ॲप्लिकेशन्सद्वारेच दंड भरावा, असे आवाहन वाहतूक संचालनालयाने नागरिकांना केले आहे.

वाहतूक संचालनालयाने नागरिकांना ई-चलन भरण्यासाठी echallan.parivahan.nic.in किंवा echallan.parivahan.gov.in या राष्ट्रीय पोर्टल्सवरून चलनाची पडताळणी करावी, असे सूचित केले आहे. त्याशिवाय वाहनधारकांच्या मदतीसाठी helpdesk-echallan@gov.in या ईमेलवर किंवा ०१२०-४९२५५०५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

गोवा राज्यासाठी वाहतूक खात्याने echallan.goatransport.gov.in आणि goa.goa.gov.in ही पोर्टल्स उपलब्ध आहेत. गोव्यातील ई-चलनशी संबंधित प्रश्नांसाठी support@goaechallan.com वर ईमेल करता येईल. दक्षिण गोव्यासाठी ६३६४१८४२८२ आणि ८१४७०८५७६३, तर उत्तर गोव्यासाठी ९९७२९०९७०२ आणि ९९७२९०९५८१ हे हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत.

अधिकृत व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट अकाउंटचे नाव Goa e-Challan (क्रमांक: +९१ ९९०२६७३२५७) असे असून एसएमएस पाठवणाऱ्याचे आयडी ‘GOATRF’ असे आहे. याव्यतिरिक्त goa.goa.gov.in पोर्टलसाठी १६०००१३०३९ आणि १८००३०९९०२० हे हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहेत, असे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

House Fire: तेंबेवाड्यात आगीचे तांडव; घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला सरकारचा मदतीचा हात

Sanjay Gupta Death: बॉलिवूडवर शोककळा!घरात झालेल्या अपघातामुळं दिग्दर्शकाचा मृत्यू! वयाच्या 57 व्या वर्षी संजय गुप्ता यांची एक्झिट

Upcoming Cars November 2026: कारप्रेमींसाठी नोव्हेंबर ठरणार खास! महिंद्राच्या Thar E सह मर्सिडीज-बेंझच्या आलिशान कारपर्यंत 7 नव्या गाड्यांची एन्ट्री होणार, पाहा लिस्ट

Gold Silver Price Drop: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव थेट गेल्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर

Goa Tourism Safety: हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक? गोवा पोलिसांकडून सायबर सुरक्षा सल्ला जारी

SCROLL FOR NEXT