Goa Metro Dainik Gomantak
गोवा

Goa Metro: गोव्यात 'मेट्रो सेवा' सुरू करा! केंद्रीय मंत्र्यांची सूचना; हैदराबाद येथील बैठकीत सविस्तर चर्चा

Goa Metro Service: गोव्यातील वाढत्या वाहतूक कोंडीला शाश्वत आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा गंभीरपणे विचार करावा, अशी सूचना केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्याला केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील वाढत्या वाहतूक कोंडीला शाश्वत आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा गंभीरपणे विचार करावा, अशी सूचना केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्याला केली आहे. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही महत्त्वपूर्ण सूचना मांडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत गोव्याचे प्रतिनिधित्व नगर विकास सचिव यतींद्र मरळकर यांनी केले. गोवा हे लहान राज्य असले तरी काणकोण, फोंडा, कुंकळ्ळी, मडगाव, पणजी, म्हापसा, पेडणे, डिचोली आणि वाळपई ही प्रमुख शहरे परस्परांशी जोडण्यासाठी आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक आवश्यक आहे.

मेट्रो नेटवर्क उभारल्यास राज्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, तसेच पर्यटक वाहतूक व स्थानिक प्रवास अधिक सुलभ होईल, असे बैठकीत सुचवण्यात आले आहे.

राज्य प्रशासनाला या पर्यायाचा अभ्यास करण्याचे आवाहन करताना, शहरी वाहतूक व्यवस्थेचे भविष्यातील गरजांनुसार नियोजन करण्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सुचवले. गोव्यातील वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो हा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्राकडून मिळेल मदत

राज्यात मेट्रो मार्गाची उभारणी झाली तर केंद्र सरकारकडून ४ ते ७ हजार कोटी रुपयांची मदत मिळू शकते. केंद्र सरकार प्रकल्पासाठी १० टक्के थेट अनुदान देते. प्रकल्प १० हजार कोटी रुपयांचा असेल तर अनुदान १ हजार कोटी रुपयांचे असेल.

राज्य सरकार यासाठी केंद्रासोबत संयुक्त संस्था उभी करत असल्यास एकूण खर्चाच्या २० टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलते. प्रकल्प लगेच नफ्यात येणार नसल्यास तूट भरपाई म्हणून खर्चाच्या १० ते २० टक्के आर्थिक मदत केंद्र सरकार देते.

...असे असू शकतील टप्पे

मेट्रो उभारणी करावयाची झाल्यास पणजी- मडगाव, पणजी-म्हापसा पहिल्या टप्प्यात, मडगाव-वास्को दुसऱ्या टप्प्यात, काणकोण-मडगाव-पणजी आणि कुंकळ्ळी-फोंडा-पणजी तिसऱ्या टप्प्यात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT