sustainable tourism Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांना गोव्यातील 'सन-सी-सँड' नकोय; आवश्यक बदलांवर काय म्हणालेत डिक्सन वाझ?

Goa Budget 2025: डिक्सन वाझ यांनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त केलं, डिक्सन वाझ हे लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायांचे उपाध्यक्ष आहेत.

Akshata Chhatre

पणजी: राज्यात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता यावर आधारित अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. बुधवारी (दि.२६) रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात पर्यटन खात्याला ४४०.९७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सध्या सरकारकडून गोव्यातील पर्यटनाला वैश्विक पातळीवर दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावर माध्यमांशी संवाद साधत असताना डिक्सन वाझ यांनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त केलं. डिक्सन वाझ हे लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायांचे उपाध्यक्ष आहेत.

काय म्हणाले वाझ?

लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायांचे उपाध्यक्ष डिक्सन वाझ यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले, मात्र त्यांच्यामते गोव्याला पर्यटन क्षेत्रात वाढ कारवाईची असल्यास काही बदल करणं महत्वाचं आहे. त्यांच्या मते गोवा राज्य हे आत्ता देखील राष्ट्रीय पातळीवर महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे पर्यटनाच्या वाढीसाठी आणखीन जाहिरात करण्याची गरज वाटत नाही.

आशिया खंडातील पर्यटक जेव्हा गोव्यात येतात तेव्हा समुद्र किनारे हे त्यांचं प्रमुख आकर्षण असत नाही. सन बेथिंग सारख्या गोष्टींमध्ये त्यांना म्हणावा तसा रस नसतो, ते रात्रीच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी किनाऱ्यांवर जातात.

जपानमधून अधिकाधिक पर्यटक भारतात येतात, तेव्हा त्यांना फक्त गोवा फिरून बघायचा नसतो तर संपूर्ण भारत फिरण्याची इच्छा असते, त्यामुळे जर का सरकारला पर्यटन वाढवायचं असेल तर त्यांनी एक टूर पॅकेज तयार केलं पाहिजे ज्यात गोव्यासोबत भारतातील काही प्रमुख ठिकाणांचा समवेश असेल.

युरोपमधून येणाऱ्या लोकांसाठी समुद्र किनारे आणि सूर्य आकर्षण आहेत, त्यामुळे या पर्यटकांना सुविधा देताना त्या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे. गोव्यात हॉटेलच्या किमती देखील महाग आहेत त्यामुळे जर का पॅकेज तयार केलं तर यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे.

तरुणांना टार्गेट करा!

सध्या गोव्यात येणारे अधिकाधिक पर्यटक हे रशिया किंवा युक्रेनमधून येणारे आहेत. इंग्लंडमधून येणाऱ्या पर्यटकांचे वय अधिक आहे. आणि म्हणूनच सरकारने तरुणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तरुण गोव्यात का येत नसतील याचा विचार झाला पाहिजे. सध्या दक्षिण गोव्यात पर्यटकांची संख्या वाढतेय, याचा अर्थ पर्यटकांना गोवा आवडतोय आणि यामध्ये जर का सरकारने चार्टर विमानसेवा सुरु केली आणि पॅकेज द्यायला सुरुवात केली तर परिणामी पर्यटनाचा खर्च कमी होईल आणि पर्यटक आकर्षित होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT