Goa Tourist Viral Video  Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांचा जीवाचा गोवा; नेटकऱ्यांचा संताप !! गाडीवर उलटं बसून नाचत जाणाऱ्या तरुणाचा Video Viral

Goa Tourism: एका पर्यटकाचा व्हिडीओ बराच गाजतोय आणि यावर नेटकरी गोव्यात मजा करण्याची ही पद्धत आहे का? अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत

Akshata Chhatre

Viral video of tourist dancing on scotty in Goa

पणजी: गोवा हा पर्यटकांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी लागलेली असतेच मात्र डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हटली की गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखीन वाढ होते. अनेकवेळा पर्यटक गोव्यात आनंद लुटण्याच्या धुंदीत स्वतःवरचा ताबा विसरून जातात आणि काही चुकीच्या गोष्टी करून बसतात. काही तासांपूर्वीपासूनच गोव्यात एका पर्यटकाचा व्हिडीओ बराच गाजतोय आणि यावर नेटकरी गोव्यात मजा करण्याची ही पद्धत आहे का? अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

तर एकूणच हा व्हिडीओ गोव्यातील प्रसिद्ध नदी म्हणजेच पणजीतील मांडावी नदीच्या पुलावरचा आहे. रात्रीच्यावेळी एक पर्यटक दुचाकीवर मागच्या बाजूने तोंड करून बसलेला पाहायला मिळतोय. एवढंच नाही तर त्याचे वेगवेगळे हावभाव आणि चालत्या गाडीवर तो करत असलेला नाच हा कधीही त्याच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता वाटते.

सध्या गोव्यात पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने अनेक घटकांना जबाबदार धरलं जातंय मात्र गोव्यात आल्याआल्या वागण्याची ही कोणती पद्धत आहे? अशा बेशीस्तपणामुळे आम्हाला कोणता फायदा होतोय? ३१ डिसेंबर तोंडावर असताना अशा प्रकारांमुळे स्थानिकांना जबाबदार धरणं कितपत बरोबर आहे? अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT