Goa Tourist Death Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

Goa Tourist Deaths 2026: आठ महिन्यांत गोव्यात एकूण ५६ पर्यटकांचा अपमृत्यू झाला असून त्यापैकी चौघांचे गोव्यात खून झाले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: एका बाजूने लांबच लांब समुद्र किनारा, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटाची नयनरम्य वनराई अशी दुहेरी देणगी मिळालेल्या गोव्यात लाखो पर्यटक भेट देत असून गोवा हे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी नंदनवन बनले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे मृत्यू हाही चिंतेचा विषय बनत आहे.

मागच्या आठ महिन्यांत गोव्यात एकूण ५६ पर्यटकांचा अपमृत्यू झाला असून त्यापैकी चौघांचे गोव्यात खून झाले आहेत. शुक्रवारी शिवोली येथे वास्तव्य करून असलेल्या पुण्यातील रोहित जळगावकर या २६ वर्षीय युवकाने स्वतःच्याच पोटात सुरा खुपसून केलेली आत्महत्या यामुळे गोव्यात पर्यटनासाठी किंवा कामाच्या निमित्ताने आलेल्या परप्रांतीयांचे होणारे मृत्यू हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत गोव्यात ज्या ५६ पर्यटकांचा अपमृत्यू झाला, त्यापैकी ४० जण भारतीय असून १६ विदेशी पर्यटक आहेत. यातील ४० पर्यटकांना आलेला मृत्यू अनैसर्गिक आहेत. १४ जणांना बुडून मृत्यू आला, तर १० जणांनी गोव्यात येऊन आत्महत्या केल्या आहेत. रस्ता अपघातात मृत्यू आलेल्या पर्यटकांची संख्या ५ असून ४ पर्यटकांचे खून झाले आहेत. त्यात दोन रशियन युवतींचा समावेश आहे. दोघांना आलेला मृत्यू अपघाती स्वरूपाचा असून एक घटना सदोष मनुष्‍यवध या गुन्‍ह्याखाली नोंद झाली आहे.

चार पर्यटकांच्‍या खुनांच्‍या घटनांनी गोवा हादरला

जानेवारी महिन्‍यात हरमल आणि मोरजी येथे दोन रशियन युवतींची गळा चिरून हत्‍या झाल्‍याचे उघडकीस आले होते. या दोन्‍ही खुनांचा समान धागा म्‍हणजे, या युवतींचा रशियन मित्र आलेक्सियो लिनोव्‍ह यानेच त्‍यांचे खून केले होते हे उघड झाले होते. आधी या दोन्‍ही युवतींकडे त्‍याने प्रेमसंबंध जुळवून नंतर त्‍यांची निर्घृण हत्‍या केली होती. अन्‍य दोन खुनांच्‍या घटनांत कर्नाटकच्‍या पर्यटकांचा समावेश असून त्‍यात ३० जून रोजी झालेल्‍या मलपे-उडपी येथील संदीप सालायम या कर्नाटक राज्‍यातील माजी मंत्र्याच्‍या ड्रायव्‍हरच्‍या खुनाचा समावेश होता. या प्रकरणात नंतर अक्षता एम. के. या युवतीला ताब्‍यात घेतले होते. पैसे लुटण्‍याच्‍या बहाण्‍याने हा खून करण्‍यात आला होता, तर चौथ्‍या खुनाची नाेंद ११ ऑगस्‍ट रोजी कळंगुट येथे झाली होती.

मृत विदेशी पर्यटकांमध्‍ये रशियन जास्‍त

जानेवारी ते ऑगस्‍ट या आठ महिन्‍यांच्‍या कालावधीत गोव्‍यात आलेल्‍या १६ विदेशी पर्यटकांना अपमृत्‍यू आला असून त्‍यात सर्वांत जास्‍त मृत्‍यू रशियनांचे झाले आहेत. या आठ महिन्‍यांत गोव्‍यात चार रशियनांचे मृत्‍यू झाले, त्‍यातील दोघांचे खून झाले होते. त्‍या पाठोपाठ तीन ब्रिटीश पर्यटकांचे मृत्‍यू झाले आहेत. याशिवाय फ्रान्‍स, स्विझलॅंड, बेलारुस, मॉरिशियस, केनिया, स्‍वीडन आणि अमेरिका या देशातील प्रत्‍येकी एका पर्यटकाचा समावेश आहे. आणखी दोन विदेशी पर्यटक नेमक्‍या कुठल्‍या देशाचे याची माहिती मिळू शकली नाही.

दर महिन्‍याला सरासरी सात पर्यटकांचा मृत्‍यू

एकूण आठ महिन्‍यांचा आढावा घेतल्‍यास दर महिन्‍याला सरासरी सात पर्यटकांचा गोव्‍यात मृत्‍यू होत आहे. ज्‍या २० पर्यटकांच्‍या मृत्‍यूंची अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून नोंद केली गेली आहे. त्‍यातील निम्‍म्‍यापेक्षा जास्‍त मृत्‍यू दारूच्‍या किंवा अमलीपदार्थांच्‍या अतिसेवनामुळे घडण्‍याची शक्‍यता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT