Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात पर्यटक कमी' ही अफवा; राज्यात पर्यटकांच्या संख्येत 21 टक्‍क्‍यांनी वाढ, मंत्री खंवटेंची माहिती

Rohan Khaunte On Goa Tourism: राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झाली. गोव्यात पर्यटक येतच नाहीत’ अशा अफवा काहींनी पसरविल्‍या होत्‍या. सरासरी पर्यटकांच्‍या संख्‍येत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झाली. गोव्यात पर्यटक येतच नाहीत’ अशा अफवा काहींनी पसरविल्‍या होत्‍या. परंतु वस्‍तुस्‍थिती अशी आहे की गोव्यातील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात देशी पर्यटकांच्या संख्येत २२ टक्‍क्‍यांनी तर विदेशी पर्यटकांच्या संख्येत ३ टक्क्यांनी वाढ झाली. म्‍हणजेच सरासरी पर्यटकांच्‍या संख्‍येत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देत असताना खंवटे बोलत होते. ते म्हणाले, मागील दोन वर्षांत कोणत्या देशांतून किती पर्यटक आले याची आकडेवारी केंद्राकडून मिळालेली नाही. त्यामुळे ती देता येणार नाही.

परंतु गोव्‍यात प्रामुख्याने विमान, रेल्वे, भूमार्ग आणि जलमार्गाद्वारे पर्यटक येतात. हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी वास्तव्य करतात. या आधारावर आकडेवारी काढता येते. येत्या काळात आम्ही ‘टाईम सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून राज्यात येणाऱ्या पर्यटकांची माहिती नोंद करणार आहोत, जेणेकरून एकूण किती पर्यटकांनी गोव्‍याला भेट दिली याबाबत निश्‍चित माहिती उपलब्‍ध असेल, असेही खंवटे म्‍हणाले.

राज्यातील पर्यटनात वाढ व्हावी यासाठी काही देशांचे पर्यटक, जे मोठ्या प्रमाणात खर्च करतात, ज्यांचा गोव्याच्या अर्थकारणाला लाभ होईल, अशा देशांतील पर्यटकांसाठी ‘एअरलाईन्‍स’ योजना राबविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या विदेशांतील राजदूतांमार्फत ‘चलो इंडिया’ योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना भारतातील विविध राज्यांमध्ये आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. ‘देखो अपना देश’च्या माध्यमातून देशातील पर्यटकांच्या वाढीसाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT