Goa Travel Guide Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Romantic Places in Goa : थंडीची चाहूल लागलेल्या या काळात अनेक जोडपी शांतता, सुंदर किनारे आणि जल्लोष अनुभवण्यासाठी गोव्याला भेट देत असतात

Akshata Chhatre

goa travel guide for honeymoon: वर्षाच्या अखेरीस, विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात, गोव्याचे वातावरण अतिशय आल्हाददायक असते. थंडीची चाहूल लागलेल्या या काळात अनेक जोडपी शांतता, सुंदर किनारे आणि जल्लोष अनुभवण्यासाठी गोव्याला भेट देत असतात. जर तुम्ही या हिवाळ्यात तुमच्या जोडीदारासोबत गोव्याच्या किनारपट्टीचा आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी दक्षिण आणि उत्तर गोव्यातील रोमँटिक स्थळांची ही खास मार्गदर्शिका..

दक्षिण गोवा: शांतता आणि निसर्ग

रोमँटिक क्षण घालवण्यासाठी दक्षिण गोव्याचा एकांत नेहमीच उत्कृष्ट ठरतो. इथे गर्दी कमी असल्याने निसर्गाचा अनुभव जास्त मिळतो.

कोला बीच: दक्षिण गोव्यात हा बीच एकांतातील स्वर्ग म्हणून ओळखला जातो. मुख्य रस्त्यापासून जवळपास ३ किलोमीटर आत असलेला हा बीच पूर्णपणे एकांत देतो. जोडप्यांसाठी हे ठिकाण अत्यंत खास आहे, कारण इथे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याचे सुंदर सरोवर आहे. ब्लू लॅगून रिसॉर्ट सारख्या ठिकाणी राहून तुम्ही निसर्गाच्या कुशीत शांत क्षण घालवू शकता.

आग्वाद बीच: कोला बीचला लागूनच असूनही हा किनारा थोडा सजीव आणि व्यावसायिक आहे. पाळोले किनाऱ्याच्या तुलनेत इथे खूप कमी गर्दी असते. त्यामुळे शांतता आणि सोयीसुविधांचा उत्तम मेळ इथे अनुभवायला मिळतो. इथे विविध उत्तम रेस्टॉरंट्स आणि निवासाचे पर्याय उपलब्ध आहेत. इथे लाँग वॉक घेत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिकाधिक वेळ घालवू शकता.

उत्तर गोवा: जल्लोष आणि उत्साह

ज्या जोडप्यांना रात्रीची मजा, पार्टी आणि नाईट लाईफ आवडते, त्यांच्यासाठी उत्तर गोवा उत्तम आहे.

हणजूण बीच: हणजूण बीच हे उत्तर गोव्यातील एक 'टूरिस्ट पॅराडाईज' आहे. इथे नाईट क्लब्स, बीचसाईड हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ची रेलचेल आहे. सकाळच्या वेळी सूर्य उगवताना आणि सायंकाळच्या वेळी सूर्य मावळताना इथे मिळणारे दृश्य अतिशय सुंदर असते, जे जोडप्यांसाठी खास रोमँटिक क्षण निर्माण करते. इथे मित्र किंवा कुटुंबासोबत तुम्ही दर्जेदार वेळ घालवू शकता.

टिटो आणि पार्टीची रात्र: गोव्यातील नाईट लाईफचे दुसरे नाव म्हणजे 'टिटो'. फर्स्ट क्लास सेवा आणि थक्क करणाऱ्या पार्ट्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे डान्सिंग, ड्रिंक्सचा अनुभव घेत 'कॉस्मोपॉलिटन' वातावरणाचा आनंद घेता येतो. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला नाचायला आणि पार्टीचा आनंद घ्यायला आवडत असेल, तर टिटोचे बॉलिवूड डिस्को आणि क्लासिक स्टाईलचे मिश्रण तुम्हाला रात्रभर जागे ठेवेल.

स्थानिक प्रशासनाकडून इथे योग्य पार्किंग आणि स्वच्छतेची व्यवस्था राखली जाते, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही पर्यटकांची मोठी गर्दी जमते. गोव्यातील शांतता, निसर्गरम्यता आणि रात्रीचा उत्साह यांचा संगम तुमच्या नोव्हेंबर/डिसेंबरच्या सहलीला एक अविस्मरणीय अनुभव देईल यात शंका नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

माजी मुख्य न्यायमूर्ती रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Video: रेडेघाट–सत्तरी येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग; परिसर प्रदूषित, घाणीचे साम्राज्य

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT