Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: अवैध व्यवसाय विरोधात पहिल्याच दिवशी चौघांवर कारवाई!

Goa Tourism: सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पर्यटन खात्याने नवीन आदेश काढला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: पर्यटन निगडीत अवैध व्यावसायिकांवर काल पहिल्या दिवशी कळंगुट पोलिसांनी चौघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. लवकरच भरारी पथक गठित करून पर्यटन उद्योग सुव्यवस्थित केला जाईल, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

पर्यटन उद्योगात अवैधरित्या व्यवहार करणारे दलाल, फेरीवाले, गाईड्स, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पर्यटन खात्याने सोमवारी नवीन आदेश काढला. यात दंडात मोठी वाढ आहे. तसेच नव्या आदेशानुसार त्यांना अटकही करता येईल.

मात्र, लगेच सर्वकाही सुरळित होणार नसून त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे संचालक देसाई यांनी स्पष्ट केले. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथक गठित केले जाईल. पर्यटन पोलिसांचे संख्याबळ वाढल्यावर कारवाई अधिक तीव्रपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले.

अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडून पर्यटकांची सतावणूक सुरुच

  • पर्यटन उद्योगाशी निगडित उपक्रम, समुद्रकिनारे, वारसा स्थळांवर दलाल आणि फेरीवाले खुलेआमपणे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करत आहे.

  • राजधानी पणजीतील मिरामार किनारा, सांतामोनिका जेटी, कॅप्टन ऑफ पोर्टस् जेटी, सेंट मेरी इमॅक्युलेट चर्च आदी ठिकाणी दलाल आणि फेरीवाले मोठ्या संख्येत फिरून येणाऱ्या पर्यटकांना त्रास देत आहेत.

  • क्रूझ जहाज सहल, जलक्रीडा उपक्रमाच्या नावाखाली पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणातील वाहनाचा पाठलाग करून त्यांना आपले खोटे पॅकेज घेण्यासाठी भाग पाडतात.

पर्यटन मंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

मिरामार येथे अवैधररित्या जलक्रीडा उपक्रम सुरू असल्याचा खुलासा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. परंतु पोलिसांना याबद्दल सूचना देऊनही अद्यापही तिथे बेकायदेशीररित्या दलाल जलक्रीडा राबवत आहे. बंदर कप्तान खात्याकडून येथे व्यवसायाची परवानगी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पर्यटन खात्याने सक्रिय व्हावे

सरकारी यंत्रणेने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे कारवाईसाठी कमी फौजफाटा आहे. मात्र, ‘नितळ’ पर्यटनाच्या घोषणा करणाऱ्या पर्यटन खात्याने अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. पर्यटन पोलिसांशिवाय पोलिस दल आणि दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. त्यामुळे ही मोहीम तीव्र व्हायला हवी.

कारवाईत सातत्य हवे: 2017-18 मध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन तसेच उघड्यावर स्वयंपाक केल्यास दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तेव्हा पर्यटन खात्याने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु, कारवाईत सातत्य दिसले नव्हते. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT