Goa tourism News Dainik Gomantak
गोवा

Goa At Times Square: गोवा पर्यटनाची टाइम्स स्क्वेअरमध्ये जाहिरात; दोन कोटी रुपयांचा खर्च

Times Square Goa Tourism Ad: विजय सरदेसाई यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटें यांनी माहिती स्पष्ट केली

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील पर्यटनाला आंतराष्ट्रीय स्थरावर चालना मिळावी म्हणून गोवा सरकारतर्फे पर्यटन विभागाने न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर येथे डिजिटल होर्डिंग जाहिरात मोहिम राबवली होती.

न्यू यॉर्कमध्ये हे डिजिटल होर्डिंग लावण्यासाठी १.९७ कोटी खर्च केले होते आणि त्यावेळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती स्पष्ट केली.

गोव्यात आंतराष्ट्रीय पर्यटकांची वाढ व्हावी म्हणून गोवा पर्यटन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्वाच्या मोहिमांपैकी ही एक आहे. गेल्या वर्षभरात गोव्याने जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रिया, फ्रान्स, दुबई, सिंगापूर, जपान आणि उझबेकिस्तान सारख्या देशांमध्ये रोड शो आणि इतर कार्यक्रम तसेच प्रदर्शनांवर अंदाजे १४. ५ कोटी रुपये गोवा सरकारने खर्च केले आहेत.

आंतराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारने परदेशात विपणातील केलेली एक महत्वपूर्ण गुंतवणूक आहे. परदेशातील पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करावे आणि गोव्यातील पर्यटनामध्ये भर पडावी अशी सरकारची इच्छा आहे.

काय म्हणाले होते सरदेसाई?

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरमधील होर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असताना ही जाहिरात लावण्यात आली होती आणि त्यात मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांचे चेहरे दाखवण्यात आले होते.

त्यामुळे जाहिरातीची वेळ आणि उद्देश यावरून पंतप्रधानांना त्यांचे समर्थक न्यूयॉर्कमध्ये देखील उपस्थित आहेत हे दाखवायचे आहे का? की लोक जाहिरात बघून थेट गोव्यात येतील असे म्हणायचे आहे? असा प्रश्न सरदेसाईंनी विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT