Goa Tourism Development Corporation Chairman Dr. Ganesh Gaonkar Gomantak Digital Team
गोवा

Morjim : मंदिरे ही संस्कृतीची केंद्रे, त्‍यांचे जतन करा - डॉ. गणेश गावकर

गणेश गावकर : मांद्रे भूमिका मंदिर परिसराचे सुशोभीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim : प्रत्येक मंदिरातून भारतीय संस्कृतीचे जतन होते. ही मंदिरे टिकविण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे. त्यासाठी सरकार, स्थानिक आमदार, पंचायत मंडळाचेही वेळोवेळी सहकार्य मिळत आहे, असे प्रतिपादन गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन डॉ. गणेश गावकर यांनी केले. सावंतवाडा-मांद्रे येथील श्री भूमिका मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण केल्‍यानंतर गावकर बोलत होते.

यावेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत, उपसरपंच तारा हडफडकर, पंचसदस्य रॉबर्ट फर्नांडिस, देवस्थानचे माजी अध्यक्ष शंबा सावंत, जयराम सावंत, गंगाराम सावंत, सखाराम सावंत, प्रदीप सावंत, बाबला सावंत, दत्ताराम सावंत, उल्हास सावंत, संतोष सावंत, सूर्या सावंत, मोहन तोरस्कर यांची उपस्थिती होती.

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पावणे दोन कोटी रुपये खर्चून या मंदिर परिसराचे सुशोभीकरण तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. आज त्‍याचे लोकार्पण करण्‍यात आले. गावकर म्‍हणाले की, यापुढेही अशा प्रकल्पांना सरकारकडून सहकार्य मिळेल. सरपंच ॲड. अमित सावंत यांनीही विचार मांडले. सखाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर विवेक सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शेवटी त्‍यांनीच आभार मानले.

सर्वांच्‍या सहकार्यामुळे सुशोभीकरणाचे हे काम मार्गी लागले. चोपडे जंक्शन ते खिंडपर्यंतच्‍या रस्त्याचे सुशोभीकरण आणि सायकलिंग ट्रॅक तयार केलेला आहे. त्याचे काम आणि दुरुस्ती केली जाईल. शिवाय पालये येथे सुशोभीकरण केलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्‍यात आलेले आहे. संबंधितांशी चर्चा करून तेही काम हाती घेण्यात येईल.

- जीत आरोलकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT