Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Rohan Khaunte: पश्चिम विभाग नागरी विमान वाहतूकमंत्री परिषदेत गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी गोव्याला भारताचे पहिले एअर-सी टुरिझम हब बनवण्याचा स्पष्ट व भविष्यकालीन दृष्टिकोन मांडला.

Sameer Panditrao

पणजी: पश्चिम विभाग नागरी विमान वाहतूकमंत्री परिषदेत गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी गोव्याला भारताचे पहिले एअर-सी टुरिझम हब बनवण्याचा स्पष्ट व भविष्यकालीन दृष्टिकोन मांडला. या वेळी केंद्र सरकारकडे काही धोरणात्मक मागण्या ठेवत गोव्याच्या पर्यटन व नागरी विमान वाहतुकीच्या विस्ताराला चालना देण्यावर भर देण्यात आला.

मुंबईतील या परिषदेत खंवटे यांनी केंद्राकडे टुरिझम स्टेट्ससाठी निवडक ‘ओपन स्काय पॉलिसी’ लागू करण्याची मागणी केली. यामुळे गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सुलभ व थेट हवाई संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे युरोप व अन्य खंडांशी थेट द्वैपक्षीय हवाई संपर्क निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला.

परिषदेत गोव्याची भविष्यातील हवाई-समुद्री पर्यटन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण मांडणी करण्यात आली. सी-एअर-क्रूझ टुरिझम इकोसिस्टम म्हणजेच हवाई, समुद्री आणि क्रूझ पर्यटनाचे एकत्रित आणि सुसंगत जाळे उभे करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या परिषदेत केंद्र आणि राज्यातील नागरी विमान वाहतूक व पर्यटनविषयक धोरणांचे समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला. गोव्यासारख्या लहान पण महत्त्वाच्या पर्यटन राज्यासाठी ही परिषद मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत गोवा सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

तरुणांना मिळणार रोजगार संधी

मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल तसेच फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून गोव्यात कौशल्य केंद्रांची उभारणी करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच आगामी काळात गोव्यातील सीप्लेन, ड्रोन आणि हेलिकॉप्टर पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक धोरणे व पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरजही खंवटे यांनी अधोरेखित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT