Rohan Khaunte Minister Of Tourism of Goa Canva, Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा पर्यटन व्यवस्थापन विधेयक मसुद्याची मुदत १५ दिवसांनी वाढवली

Rohan Khaunte: रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे विधेयक लाभदायक ठरेल, असा विश्वास

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन प्रोत्साहन आणि व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा - २०२४ लोकांची मते व सूचनांसाठी खुला आहे. ६ जुलैची अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात येत असल्याची घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज केली.

राज्यातील पर्यटनाला नवा आयाम देत बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध कारवाई करता यावी या हेतूनेच हे विधेयक असल्याचे खंवटे यांनी सांगितले. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे विधेयक लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील पर्यटन व्यवसायाला हे विधेयक बळकटी देणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच हे विधेयक आणले आहे. पुढील १० दिवसांत मंत्री व आमदारांना विधेयकाबद्दल सादरीकरण करून त्याविषयीची स्पष्टता देणार असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धात्मक पर्यटन काळात गोमंतकीयांसाठी त्यांचे व्यवसाय टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी या विधेयकाचा लाभ होईल, असेही ते म्हणाले.

३३ बैठकांमधून सल्लामसलत

मागील ४० वर्षांत पर्यटन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. अशावेळेस जुन्या कायद्यात बदल गरजेचे ठरतात. ३३ बैठकांमधून सल्लामसलत करून तयार केलेले हे विधेयक महत्त्वाचे आहे. विधेयकाचा मसुदा सूचनांसाठी खुला असल्यामुळे सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT