Goa tourism growth 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa tourism growth 2025: जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या काळात राज्यातील एकूण पर्यटकांच्या संख्येत ६.२ टक्के वाढ झाल्याचा दावा खंवटे यांनी केला.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा सोशल मीडियातून केला जाणारा दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचे मत राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मांडले आहे. राज्यात पर्यटकांची संख्या वाढली असून, पहिल्यांदाच पावसाळ्यातही पर्यटकांची विक्रमी नोंद करण्यात आली. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या काळात राज्यातील एकूण पर्यटकांच्या संख्येत ६.२ टक्के वाढ झाल्याचा दावा खंवटे यांनी केला.

राज्यात देशी पर्यटकांच्या संख्येत ५.४ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये राज्यात ६९ लाख २४ हजार ९३८ पर्यटक ले होते तर २०२५ मध्ये ७२ हजार ९६ हजार ०६८ पर्यटक दाखल झाले.

तसेच, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत २९.३ टक्के वाढ झाल्याचे खंवटे म्हणाले. राज्यात पर्यटकांच्या एकूण संख्येत ६.२ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील पर्यटन कमी झाले असून, पर्यटक आंतरराष्ट्रीय पर्यटनाला पसंती देत असल्याचा दावा सोशल मीडियावरुन केला जात आहे. याला प्रतित्युत्तर म्हणून खंवटे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटनाचा १६.४ टक्के हिस्सा आहे, यातून ४० ते ४५ टक्के प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होते. राज्यात पहिल्यांदाच मान्सून काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे मंत्री खंवटे म्हणाले.

गोवा अनेक नव्या देशांपर्यंत पोहोचला असून याचा फायदा झाल्याचे खंवटे म्हणले. यामुळे ३४ चार्टर फ्लाईट रशिया आणि सेंट्रल आशियातून गोव्यात आल्या. थोड्याच दिवसांत मँचेस्टर आणि गॅटविक येथील थेट फ्लाईट सुरु होतील, यामुळे ३० ते ४० हजार पर्यटक गोव्यात येतील, असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला. गोवा नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलँडमध्ये देखील पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही खंवटे म्हणाले.

"पर्यटनाशी निगडीत ४७२ कोटी रुपयांचे नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यात स्वदेश दर्शन, टाऊन स्क्वेअर, युनिटी मॉल आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रकल्प राज्यात होत आहेत", असे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

SCROLL FOR NEXT