international trips affordable Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: "गोव्यात वीकेंड महागडा, दुबईत जाणं परवडलं" मध्यमवर्गीयांसाठी परदेशच 'बेस्ट'?

Goa vs Dubai Travel: एंजल गुंतवणूकदार उज्ज्वल सुतारिया यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये एक मुद्दा मांडला आहे

Akshata Chhatre

Goa Hotel Rates: भारतीय पर्यटनाच्या क्षेत्रात सध्या अनेक बदल दिसून येत आहे. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेले देशांतर्गत पर्यटन आता श्रीमंतांची मक्तेदारी बनत चालले आहे गोवा, मनाली किंवा मुंबईसारख्या ठिकाणी वीकेंडला जाणे, दुबई किंवा जॉर्जियाला जाण्यापेक्षा अधिक खर्चिक बनत चाललंय असं म्हणत एंजल गुंतवणूकदार उज्ज्वल सुतारिया यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये एक मुद्दा मांडला आहे.

मध्यमवर्गीय पर्यटकांना मोठा फटका बसतोय...

या बदलामागे प्रमुख कारण म्हणजे भारतातील रिअल इस्टेट बाजारपेठेतील प्रचंड वाढ. गेल्या दशकात जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम पर्यटन क्षेत्रावर होतोय. हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदारांना वाढलेल्या किमती ग्राहकांकडून वसूल कराव्या लागतायत."पर्यटन महागण्याचे फक्त विमानतळावरील ४०० रुपयांचा चहा किंवा महागडी हॉटेल रूम्स हे कारण नाही," असं पर्यटन विश्लेषक मीरा जोशी सांगतात.

पर्यटन स्थळांवरील जमिनीच्या किमती १५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अयोध्यामध्ये काही वर्षांतच किमती १० पट वाढल्या, तर बंगळुरू आणि हैदराबादमध्ये २०१९ पासून ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे मध्यमवर्गीय पर्यटकांना मोठा फटका बसतोय असं त्या म्हणाल्या आहेत.

रिअल इस्टेटची बाजारपेठ २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता दिसत नाही. या वाढत्या किमतींमुळे केवळ श्रीमंत लोकच पर्यटन करू शकतील, अशी भीती व्यक्त केली जातेय. मात्र, या परिस्थितीतही संधी आहे. परवडणारी निवास व्यवस्था, अनोखी पर्यटन स्थळे आणि वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या उद्योजकांसाठी हे एक मोठे आव्हान तसेच संधी देखील आहे.

आर्थिक विकास आणि परवडणारी किंमत

"आपल्याला देशांतर्गत पर्यटनाची कल्पना नव्याने आखण्याची गरज आहे," असं पर्यटन तंत्रज्ञान उद्योजक आनंद देशपांडे म्हणतात. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन पद्धतींचा अवलंब करून, आपण सर्वसमावेशक आणि शाश्वत पर्यटन विकसित करू शकतो, जे पर्यटक आणि स्थानिक समुदायांसाठी फायदेशीर असेल. आर्थिक विकास आणि परवडणारी किंमत यांचा समतोल साधल्यास, भारताच्या सौंदर्याचा आणि विविधतेचा अनुभव प्रत्येक पर्यटकाला घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT