Goa Heritage Site  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यातील 'दिल चाहता है' फेम किल्ल्याला भेट द्यायला आता मोजावे लागणार पैसे; 11 वारसा स्थळांवर प्रवेश शुल्क लागू

Goa Heritage Sites: गोव्यातील 11 ऐतिहासिक स्थळांवर प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे

Akshata Chhatre

Goa Heritage Sites Entry Fee

पणजी: गोवा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. समुद्रकिनारे आणि पार्टी वगळल्यास गोव्यात काही ऐतिहासिक जागा देखील आहेत जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. तुम्ही जर का गोव्याला यांपैकीच काही वारसा स्थळांना भेट द्यायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

गुरुवारी (दि. २ जानेवारी २०२५) रोजी घेतल्या गेलेल्या एक महत्वाच्या निर्णयानुसार गोव्यातील ११ वारसा स्थळांवर प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सरकारची परवानगी मिळाल्यानंतर हा निर्णय लागू केला जाईल.

पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील काही ऐतिहासिक किल्ले आणि इतर वारसा स्थळांवर ५० रुपयांचे प्रवेश शुल्क लागू केले जाईल.

या वारसा स्थळांचा समावेश

या वारसा स्थळांमध्ये सामील होणाऱ्या ठिकाणांमध्ये शापोरा किल्ला, हळर्ण किल्ला, काब दे राम किल्ला, खोर्जुवे किल्ला, खांडेपार येथील लेणी आणि पणसाईमळ येथील शिलालेख यांचा समावेश आहे.

याशिवाय सांत इस्तेव्ह किल्ला, मुरगाव किल्ला, साखळी किल्ला याही ठिकाणांचा समावेश आहे. सध्या गोवा तसेच गोव्याबाहेरील सर्व पर्यटकांसाठी प्राथमिक पातळीवर ही रक्कम लागू केली जाईल, मात्र लवकरच विद्यार्थी वर्गासाठी काही सवलत देण्याचा विचार देखील केला जाणार आहे. प्रिव्हेडिंग शूट, फिल्म शूटिंग किंवा आणखीन कोणत्याही कॅमेरा शूटिंगसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल, ज्याबद्दल लवकरच माहिती दिली जाणार आहे.

पर्यटकांना आता या ठिकाणांना भेट देण्यासाठी नाममात्र शुल्क भरावे लागेल. तुम्हाला जर का या वारसा स्थळांचा जवळून आनंद घ्यायचं असेल किंवा ही ठिकाणं अगदी संपूर्ण परिसर फिरून बघायची असतील तर आता मात्र काही कर नक्कीच द्यावा लागेल.

अशा उपक्रमांमधून वारसास्थळांचे नुकसान टाळणे, तसेच या ठिकाणांना अधिक चांगल्या प्रकारे जतन करण्याला मदत मिळते. पर्यटन विकास आणि वारसा संवर्धन यामध्ये समतोल साधण्याचा हा एक प्रयत्न असल्याने यामुळे गोव्याचा सांस्कृतिक ठेवा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT