Kayaking | Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; गोव्यात आता लवकरच 'नॉटीकल टुर्स'

Goa Tourism: 'जीटीडीसी'चे हे उपक्रम डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी 2023 मध्ये उद्‍घाटन होणार..

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) राज्यात उच्च वर्गाच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नॉटीकल टुर्स आणि शूटिंग रेंज, असे दोन नवीन उपक्रम सुरू होणार आहेत. दोन्ही उपक्रम पेडणे तालुक्यातील मोरजी आणि मांद्रे येथे येणार आहेत. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी 2023 मध्ये यांचे उद्‍घाटन होईल, अशी माहिती ‘जीटीडीसी’ने ‘गोमन्तक’ला दिली.

नॉटीकल टुर्स उपक्रम हा मोरजी येथे शोपारा नदीत येणार आहे. येथे कायाकिंग आणि यॉट राईड्सचा पर्यटकांना अनुभव घेता येईल. सध्या कायाकिंग प्रकार खासगी स्वरुपात काही ठिकाणी सुरू आहे, परंतु हा मोठ्या स्तरावर असणार आहे.

कायाकिंगासाठी 1320 ते चार हजार रुपयांचे पॅकेज असणार आहे. तर यॉट राईड्ससाठी 1320 ते पाच हजार रुपये असे पॅकेज असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दोनापावल येथे कायाकिंग सुरू करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी पर्यटकांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा प्रशिक्षक, तसेच सुरक्षेसाठी लागणारी उपकरण आणि जीवरक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. कोकण नॉटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला उपक्रमासाठी कंत्राट दिले आहे.

शुटिंग रेंज मांद्रे येथे असणार असून 25 आणि 50 मीटर अशा अंतराच्या शुटिंग रेंज उपलब्ध असणार आहेत. थरारक अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी हा उपक्रम असणार आहे. यश शुटिंग रेंज कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

‘पीपीपी’ तत्वावर ‘जीटीडीसी’चे उपक्रम!

गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून सुरू केलेले आणि भविष्यात सुरू होणारे पर्यटन उपक्रम हे खासगी - सार्वजनिक - भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालणार आहेत. यात नियुक्त कंपनी उपक्रमासाठी लागणारा खर्च उचलणार आहे.

जीटीडीसीला वार्षिक ठराविक शुल्क किंवा एकूण महसुलाचा पाच टक्के भाग (जे जास्त असेल ते) दिला जाईल. जीटीडीसी यात निधी गुंतवणार नाही, केवळ कंपनीला मार्केटिंगसाठी मदत केली जाणार आहे.

निखिल देसाई, संचालक, पर्यटन खाते-

राज्यात दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले जात आहेत. यात साहसी पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न असून भविष्यात आणखी नवे उपक्रम सुरू होणार आहेत. इतर राज्यांशी स्पर्धा असल्याने पर्यटन उद्योगातील नवे प्रकार शोधण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे हे उपक्रम सरकारी निधीच्या गुंतवणुकीऐवजी ‘पीपीपी’ तत्त्वांवर केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT