Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर 8 कोटींचा प्रकल्प; पार्किंग समस्येवर कायमचा तोडगा निघणार? स्थानिकांचा मात्र विरोध

Morjim Multipurpose Parking Project: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यासाठी पर्यटन खाते वेगाने काम करत आहे. मोरजी येथील तेमवाडा या भागात पर्यटन खात्याद्वारे प्रशस्त पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहे.

Manish Jadhav

Goa Tourism Department To Develop Parking Project At Morjim Temwada

मोरजी: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यासाठी पर्यटन खाते वेगाने काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर मोरजी येथील तेमवाडा या भागात पर्यटन खात्याद्वारे प्रशस्त पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहे. येथील पार्किंगच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा पर्यटन खात्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. उद्या (25 फेब्रुवारी) म्हणजेच मंगळवारी खुद्द राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाची अंदाजे किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे मात्र, स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु केला आहे.

काय म्हणाले अरोलकर?

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरु झाले असून 25 फेब्रुवारी म्हणजेच उद्या पर्यटन मंत्री रोहन खवंटे (Rohan Khaunte) यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाजवळ अनेक तात्पुरते स्टॉल उभारण्यात आले असून आता ते कायमस्वरुपी स्टॉलमध्ये रुपांतरित केले जातील. सुरुवातीला, या ठिकाणी 20 स्टॉल उभारले जातील.

तात्पुरते स्टॉल

आरोलकर यांनी पुढे सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक जमीन मालक किनारपट्टीच्या भागात तात्पुरते स्टॉल उभारत आहेत. जिथे ते कपडे, चहा इत्यादी विकण्याचे व्यवसाय करत आहेत.

पर्यटनमंत्री खवंटे काय म्हणाले?

पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी या प्रकल्पाबाबत बोलताना सांगितले की, 'मोरजी समुद्रकिनाऱ्यावरील (Morjim Beach) तेमवाडा येथील बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.' दुसरीकडे मात्र, या बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्पाच्या स्वरुपाबाबत स्थानिक विरोध करु लागले आहेत.

मोरजी पंचायतीची ग्रामसभा गाजली

रविवारी (23 फेब्रुवारी) मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच पवन मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थानिकांनी ग्रामसभेत या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला. अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे गावातील समस्यांमध्ये अजून भर पडेल. या प्रस्तावित प्रकल्पाकडे जाण्यासाठी किमान 25 मीटर रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याचे देखील स्थानिकांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT