पणजी, गोवा पर्यटन विभागाने गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टमध्ये आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी गोव्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दर्शन घडविणाऱ्या सफरीचे आयोजन केले होते.
या अनुभवांद्वारे, गोव्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक खजिन्यांवर प्रकाश टाकण्यावर लक्ष केंद्रित केले गेले सोबतच जबाबदार पर्यटनाच्या महत्त्वावरही भर दिला गेला. पर्यटकांना गोवा दर्शनबद्दल खात्यातर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
करमळी पक्षी अभयारण्यातील मंत्रमुग्ध करणाऱ्या पक्षी निरीक्षण सहलीपासून, वन्यजीव तज्ञांच्या मार्गदर्शनातून, गोव्याच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल पाहुण्यांना विस्तृत माहिती देण्यात आली. युनेस्कोने मान्यता दिलेल्या गोव्यातील जागतिक वारसास्थळांना देखील भेट देण्यात आली.
पणजी मधील गोव्याचे लॅटिन क्वार्टर, फेनी आणि हुर्राक सारखे स्थानिक पेय, आग्वाद किल्ल्यावरील ध्वनी आणि प्रकाश शो यांचे निमंत्रितांना दर्शन घडवले. तुरुंगाच्या कोठडीच्या भिंतींमध्ये पुरावा म्हणून जगण्यासाठीच्या अथक संघर्षाच्या इतिहासाबद्दल एक अनोखा दृष्टिकोन देणारा आग्वाद किल्ला अभ्यागतांना शूरवीर इतिहासाची झलक देतो.
...शाश्वत पर्यटन!
पुनर्संचयित पर्यटन तत्त्वांवर गोव्याने लक्ष केंद्रित केले आहे. पर्यटन क्रियाकलापांचा पर्यावरणावर आणि स्थानिक समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडेल, याची खात्री करण्यासाठी गोवा पर्यटन विभागाची बांधिलकी प्रतिबिंबित करते.
कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन आणि स्थानिक व्यवसायांना पाठिंबा यासारख्या पद्धतींना चालना देऊन गोव्यात अधिक शाश्वत पर्यटन उपक्रमांसाठी राज्य व्यासपीठ तयार करते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.