Goa Tourism Calangute Beach: Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: कळंगुट-बागा पर्यटकांनी फुलले; पण गर्दी गतवर्षीपेक्षा निम्मीच...

नियमितच्या पर्यटकांमध्ये घट

Akshay Nirmale

Goa Tourism Calangute Beach: गोव्यातील सुप्रसिद्ध बीच असलेल्या बागा आणि कळंगुट येथील किनारे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर गर्दीने फुलले असले तरी ही गर्दी गतवर्षीपेक्षा अर्धीच आहे, असे मत येथील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. नियमित येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

रविवारी नवीन वर्षाच्या रात्री कळंगुटमध्ये लोकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. पण, या इयर एंडला तुलनेत कमी गर्दी दिसून येत आहे, असे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक सांगतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कळंगुटचे माजी सरपंच आणि हॉटेल व्यावसायिक शॉन मार्टिन म्हणतात, “आता पूर्वीइतकी गर्दी होत नाही. कदाचित वाढलेले हवाई भाडे, हॉटेलचे दर आणि इतर सर्व गोष्टींच्या किंमती यामुळे लोकांचा हिरमोड झाला असावा.”

बागा शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे सरचिटणीस व्यापसायिक जॉन लोबो सांगतात, नियमित येणारे वार्षिक पर्यटक या हंगामात मोठ्या प्रमाणात गोव्यापासून दूर राहिले आहेत असे दिसते.

गोव्याची जी काही नकारात्मक प्रसिद्धी होत आहे, त्यामुळेही असेल कदाचित. मला सर्वसामान्यपणे जी गर्दी दरवर्षी दिसते ती यंदा दिसून येत नाही. गर्दी कदाचित 50 टक्के कमी आहे.

ते म्हणतात, "एक मोठा वर्ग गोव्याची प्रतिमा खराब करत आहे आणि गर्दीला इतर ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत आहे." जॅझ संगीतकार कॉलिन डी'क्रूझ यांच्या मते, पीक सीझनमध्ये जवळपास रिकामी ठिकाणे असलेले गोवा हे आता सर्वोच्च पर्यटन स्थळ राहिलेले नाही.

सरकारला रात्री 10 वाजेपर्यंतची मुदत आणि गोव्यातील पर्यटकांना अक्षरशः दूर पळवणाऱ्या टॅक्सींना जागे करण्याची गरज आहे."

अनेक हॉटेल्सचे मालक असलेले कळंगुटचे आमदार मायकेल लोबो म्हणाले, “या वर्षी परदेशी आणि देशी पर्यटकांमध्ये मोठी घट झाली आहे. 31 डिसेंबर आणि त्यानंतर दोन दिवस गर्दी असू शकते, पण गोव्यात 365 दिवसांत पर्यटकांत घसरण का झाली याचा अभ्यास केला पाहिजे.”

दरम्यान, काही जण सांगतात की, यंदा पोलिसांची वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम होती. प्रत्येक जंक्शनवर, एक पोलिस दिसून येतो. तर काहीजण मात्र वाहतूक पोलिसांकडून त्रास होत असल्याची तक्रार करतात.

हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावलेल्या पर्यटकांच्या मागे वाहतूक पोलिस धावतात. त्याऐवजी त्यांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची तपासणी करावी,” असेही काहींचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT