Goa Today's Live News Update Dainik Gomantak
गोवा

Goa Today's News Wrap: अमली पदार्थ कारवाई, गोव्याला पुरस्कार; दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा

Ganeshprasad Gogate

12.65 लाखांच्या अमली पदार्थ आणि रोख रक्कमेसह इराणी नागरिकाला अटक

अमली पदार्थ आणि रोख रक्कमेसह इराणी नागरिकाला मांद्रे पोलिसांकडून अटक. संशयित हमीद तेहराण (41, रा, चिवार, हणजूणे, मूळ- इराण) याच्याकडून 285 ग्रॅम वजनाचा गांजा, 52.190 ग्रॅम चरस, 4.110 व 2.470 ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ आणि 41,300 रोकड असा एकूण 12.65 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Goa Today's Live News Update | Crime News

गोवा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य

NDTV इंडियन ऑफ द इयर 2023-24 च्या पुरस्कारांची घोषणा. लहान राज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा गोव्याला पुरस्कार.

Goa CM|NDTV

पिळगाव येथे घरांवर दगडफेक, खिडक्या फोडल्या

पिळगाव येथे घरांवर दगडफेक. मुस्लिम बांधवांच्या वेगवेगळ्या तीन घरांच्या काचेच्या खिडक्या फोडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीची घटना.

फोटो मोर्फ करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!

सुकूर पर्वरी येथे चावडेश्वर देवाच्या घुमटीकडे नागाचा फोटो मोर्फ करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. अज्ञाताविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल. तपास सुरू.

Goa News

मेलावली सत्तरी येथे कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग

मेलावली सत्तरी येथे कचऱ्या प्रकल्पातील कचऱ्याला आग. वाळपई अग्निशमन तर्फे मदतकार्य आग आटोक्यात

Goa Fire News

55 हजार लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त

Anmod Excise Dept

अनमोड अबकारी विभागाने दोन वाहनांमधून तब्बल 55,250 लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले असून, शरीफ हजरेसाब आणि निगाप्पा यांना अटक केलीय.

Anmod Excise Dept

काँग्रेस गोव्यातील दोन्ही लोकसभा उमेदवार 27 मार्चला करणार जाहीर

Goa Congress Loksabha Candidate

काँग्रेस 27 मार्च रोजी गोव्यातील दोन्ही लोकसभा उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत मंत्री विश्वजीत राणेंचा वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आरोग्य, वन आणि नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, पत्नी देविया राणे उपस्थित होते.

मोठी बातमी! पणजी शहरात पे पार्किंग शुल्क वसुली बंद

पणजी शहराचे महापौर श्री रोहित मोन्सेरात यांनी उद्यापासून 31/05/2024 पर्यंत पणजी शहरात पे पार्किंग शुल्क वसूल करणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pay-Parking

टायनी टॉट्स स्कूलनजीकच्या बंद गाळ्यातून धूराचे लोळ, अग्निशमन घटनास्थळी

Panaji Fire

पणजी- ताळगाव भाटलेतील टायनी टॉट्स स्कूलपासून जवळ असलेल्या चर्चच्या मागील सोसायटीत बंद गाळ्यातून धूर येऊ लागल्याचे निदर्शनास आलेय. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे.

पेडामळ शिरवई येथे अज्ञाताने फोडल्या कारच्या काचा

केपे पेडामळ शिरवई येथे पाच कारच्या अज्ञाताने काचा फोडल्या आहेत. याच भागात गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. गावकऱ्यांनी केपे पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.

काजूवर हवामानाचा परिणाम, काजू बागायतदार चिंतेत

काजूवर हवामानाचा परिणाम. काजू बागायतदार चिंतेत. जमीन मालक शुल्क आणि कामगारांचे पेमेंट इत्यादींमुळे नफा कमी झाला. फेणी उत्पादकांना शासकीय सुविधा व मासिक वेतन देण्याची सरकारला विनंती.

राज्यात मंगळवारपासून ‘घुमचे कटर घूम...’

राज्यात शिमगोत्सवाचा वार्षिक सोहळा 26 मार्च ते 8 एप्रिल 2024 दरम्यान होणार आहे. या कालावधीत अनुक्रमे फोंडा, कळंगुट, साखळी, वाळपई, पर्वरी, डिचोली, काणकोण, पेडणे, वास्को, शिरोडा, कुडचडे, केपे, धारबांदोडा, मडगाव, म्हापसा, सांगे आणि कुंकळ्ळी येथे पारंपरिक मिरवणूक होणार आहे.

डिचोलीत शिगमोत्सवाचा उत्साह

शिमग्याच्या सामानाने बाजारपेठ फुलल्या. गुलाल, पिचकारी,अक्राळविक्राळ मुखवट्यांनी बाजार भरला. विशेष म्हणजे मोदींच्या चेहऱ्याच्या मुखवट्यांनी लक्ष वेधून घेतले आहे..

म्हापसा येथे परप्रांतीय तरुणावर प्राणघातक हल्ला; आरोपी फरार

घाटेश्वरनगर, म्हापसा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील मोहम्मद उस्मान (२२) याच्यावर सुरीच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरोधात म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल. संशयित चिराग व त्याचा साथीदार फरार

गोव्यातील आजच्या इंधनाच्या किमतीत किरकोळ बदल; वाचा पेट्रोल-डिझेलचे दर

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 96.07

Panjim ₹ 96.07

South Goa ₹ 95.55

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88. 61

Panjim ₹ 88. 61

South Goa ₹ 88.10

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT