गोवा

Goa News : मुसळधार पावसानं उडवली दाणादाण, सत्तरीत गावकरांच्या घराचे छत पडले; आमदार देविया राणेंचा मदतीचा हात

Goa News Live Update's In Marathi: गोव्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, मनोरंजन, पर्यटन, अपघात, वाहतूक यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

मुसळधार पावसानं उडवली दाणादाण, सत्तरीत गावकरांच्या घराचे छत पडले; आमदार देविया राणेंचा मदतीचा हात

सालेली सत्तरी येथील राजाराम गावकर यांना आमदार डॉ देविया राणे करणार मदत, जोरदार पावसामुळे बुधवारी (29 ऑक्टोबर) सकाळी त्यांचा घराचे छत पडून मोठे नुकसान झाले आहे.

"पोलिसांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा" - 'आप'चे अध्यक्ष अमित पालेकर यांची मागणी

आम आदमी पार्टीचे (AAP) गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पालेकर म्हणाले की, "गोवा पोलीस आता बाउन्सर आणि गुंडांसारखे वागत आहेत. विशेषतः काही नव्याने नियुक्त झालेले पीएसआय (PSI) खंडणीखोर (Extortionists) आणि गुंड बनले आहेत."

अवकाळी पावसाचा शेतीला फटका; सरकार देणार प्रति हेक्टर 40 हजारांची नुकसान भरपाई

गोव्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 40 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी कृषी विभागाकडून लवकरच पाहणी (Survey) केली जाईल.

गोव्यात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाचा कहर सुरुच आहे. दुपारी बारा वाजता डिचोली बाजारात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांची धावपळ झाली. हवामान खात्याने राज्यात आज यलो अलर्ट जारी केला असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हरमल समुद्रकिनाऱ्यावर वस्तूंची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

हरमल समुद्रकिनारी वस्तूंची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या जार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिनाक्षी लामाणी, सरोज लमाणी, चंद्रावा लमाणी, उमा कारभारी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सर्वजण समुद्रकिनारी विविध वस्तूंची विनापरवानगी, बेकायदेशीरपणे विक्री करत होते.

गोव्यात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

हवामान खात्याने गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासह वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राजस्थानी पर्यटक रेंटने घेतलेली कार घेऊन झाला फरार?? पोलिस तक्रार दाखल

भाड्याने घेतलेली कार परत न करता राजस्थानी पर्यटक फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कार आणि संशयित आरोपीचा शोध सुरु केला आहे. पर्यटकाने ओर्डा, कांदोळी येथून कार भाड्याने घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT