Goa Today's Live Update Dainik Gomantak
गोवा

Goa Today's News: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Pramod Yadav

धारगळ दादाचीवाडी नजीक हिट अँड रन प्रकरण

भरधाव कारने दुसऱ्या कारला दिली धडक. अपघातानंतर चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न. स्थनिकांनी चालकाला पकडले. सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाही

CAA अधिसूचना घोषणेनंतर CM सावंतांनी मानले सोशल मीडियावर मोदींचे आभार

भारताच्या इतिहासातील एक उल्लेखनीय दिवस. CAA नियमांच्या अधिसूचनेबद्दल मी माननीय पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. CAA द्वारे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना हक्क प्राप्त होईल - मुख्यमंत्री सावंत

म्हापसा पालिका मार्केट समितीच्या चेअरमनपदी नगरसेवक साईनाथ राऊळ

Mapusa Market

म्हापसा पालिका मंडळाच्या विशेष बैठकीत पालिका मार्केट समितीच्या चेअरमनपदी नगरसेवक साईनाथ राऊळ यांची निवड. यावेळी विविध समित्या व उपसमित्यांची स्थापना करण्यात आली.

सुनेत्रा जोगांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादक पुरस्कार जाहीर

२०२३ वर्षाचे साहित्य अकादमीचे उत्कृष्ट अनुवादक पुरस्कार जाहीर. मूळ इंग्रजी लेखिका मैथिली राव यांच्या Disorderly Women या पुस्तकाच्या कोंकणी अनुवादासाठी (अस्ताव्यस्त बायलो) सुनेत्रा जोग यांना प्राप्त झाला पुरस्कार.

चिंबल येथेल अतिक्रमण करुन बेकायदेशीरपणे जमिनी परप्रांतीयांना विकल्याचा आरजीचा आरोप

चिंबल येथील 50000 चौ.मी. महसुली जमिनीवर अतिक्रमण करून परप्रांतीयांनी घरे बांधली आहेत. जमिनीची खोटी विक्रीपत्र करून इतर परप्रांतीयांना विकल्याचा आरजीचा आरोप.

चिंबल पंचायतीने देखील तातडीची बैठक घेऊन पाणी आणि वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला. सरकारला याबाबत श्वेतपत्रिका सादर करायला सांगण्याचे धाडस आरजीने केले.

प्रशांत नाईक यांची मांद्रे पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

Mandrem Sarpanch

प्रशांत नाईक यांची मांद्रे पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. नाईक आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार आहेत.

Mandrem Sarpanch | Jit Arolkar

कामरखाजन, म्हापसा येथे अपघात, माय लेक जखमी

Goa Accident

कामरखाजन, म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक. कारमधील महिला व अल्पवयीन मुलगी जखमी. अपघातग्रस्त कारच्या समोरील भागाचे नुकसान, पोलिस घटनास्थळी दाखल.

Goa Accident News

गोवा कॅबिनेटच्या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय

Goa Cabinet Meeting

- अशोक परब यांची आयएमबीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती

- कदंबाच्या नवीन 15 इलेक्ट्रीक बस घेणार

- राज्य कर कार्यालयात 54 नव्या पदांची भरती

- गोवा मायनर मिनरल नियमांमध्ये दुरुस्ती

- समुद्र किनाऱ्यावरील तात्पुरत्या शॅक उभारणीसाठी नवा अध्यादेश

Goa Cabinet Meet | Goa Today's Live Update | CM Pramod Sawant | Rohan Khaunte

म्हणून सार्दिन यांना पाठिंबा देणार नाही - सरदेसाई

माणिकराव ठाकरे यांची भेट घेऊन मी सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. कोणाला तिकीट द्यायचे हा काँग्रेसचा निर्णय आहे. माझी भूमिका स्पष्ट असून सार्दिन यांनी फातोर्डात खासदार निधीतून काहीही काम केलेले नाही, यामुळे मी त्यांना पाठिंबा देणार नाही, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

मोरजीत सुपर मार्केटमध्ये चोरी, 2.20 लाखांचा मुद्देमाल लंपास

Morim Theft Case

मोरजी येथील आनंदी अनंत मिनी सुपर मार्केटमध्ये चोरी. मार्केटमधून चोरट्यांने सीसीटिव्ही मशीन, मद्याच्या बाटल्या, रोख रक्कम 20 हजार रुपये असा एकूण 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.

Morim Theft Case

हणजुणेत दुचाकीचा अपघात, आंध्रप्रदेशमधील युवती ठार

Anjuna Accident

संरक्षक कठड्याला दुचाकीची धडकेनंतर रस्त्यावर कोसळलेल्या आंध्र प्रदेशच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या अंगावरुन भरधाव कार गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हणजुणेत आज (दि. ११ मार्च) सकाळी हा अपघात झाला.

Anjuna Accident

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT