Guirim Mapusa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Today's News: तीन अपघात, 1 ठार, 6 जखमी, CM सावंत यांचा वाढदिवस; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa today's 24 April 2024 Live News: लोकसभा, राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा, कला यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

गिरी-म्हापसा अपघात, ट्रक चालकाला अटक

Guirim Mapusa Accident

गिरी -म्हापसा येथील अपघात प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. म्हापसा पोलिसांनी चालक बनीराम जनाथन मुर्मू याला बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी अटक केलीय.

गिरी येथे अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला होता तर इतर चारजण जखमी झाले होते.

लाच प्रकरण! तळकर, कलंगुटकर यांना जामीन मंजूर

लाच प्रकरणी अटक केलेले तेरेखोल पोलिस स्थानकातील संजय तळकर आणि उदयराज कलंगुटकर या दोघांना एक लाख रूपयांच्या हमीवर आज सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील अन्य आरोपी तत्कालीन निरीक्षक विद्धेश पिळगांवकर यांची सुनावणी उद्या (गुरुवारी) सकाळी ठेवण्यात आली आहे

गोव्यात 36 दिवसात 16.65 कोटींचे ड्रग्ज, सोने, दारु आणि रोख रक्कम जप्त

गोव्यात गेल्या 36 दिवसात एनसीबी, रेल्वे, अबकारी, पोलिस, आयकर खात्याकडून 16.65 कोटींचे अमली पदार्थ, सोने, दारु आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत.

म्हापसा - शिवोली उतारावर ट्रकचा अपघात, चालकासह तिघेजण जखमी

म्हापसा - शिवोली उतारावर ट्रकचा अपघात झाला असून, यात चालकासह तिघेजण जखमी झाले आहेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने म्हटले आहे.

Goa Accident

मालिम जेट्टीवरील अस्वच्छता, बेकायदेशीर प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय खात्याच्या संचालकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

मालिम जेट्टीवरील अस्वच्छता आणि बेकायदेशीर प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय खात्याच्या संचालकांची नोडल अधिकारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून नियुक्ती.

तसेच, गोव्यातील इतर पाच जेटींची अचानक तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने मत्स्य खात्याला दिले असून तेथे बेकायदेशीर प्रकार व अस्वच्छता आढळल्यास न्यायालयाच्या आदेशात सुचवलेल्या शिफारशी गोव्यातील सहाही जेटींवर लागू केल्या जातील.

या शिफारशींचा अनुपालन अहवाल 12 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश न्यायालयाने नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

धेंपे, भाऊंच्या प्रचारार्थ सांकवाळमध्ये मोदींची तोफ धडाडणार

PM Modi To Campaign In Goa

पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या शनिवारी (२७ एप्रिल) सांकवाळ येथे सायंकाळी ७ वाजता भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा होईल. राज्यातून ५० हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती राहणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती.

PM Modi To Campaign In Goa

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Goa CM Pramod Sawant Birthday

पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्वीट करत दिल्या मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सवंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार.

कचरावाहू ट्रकचा गिरीत अपघात, एक ठार, दोघे जखमी

Goa Accident News

पणजीच्या दिशेने जाणारा कचरावाहू ट्रक गिरी राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाचे रेलिंग तोडून सर्व्हिस रस्त्यावर कोसळला. गाडीवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या या भीषण अपघातात कर्मचारी ठार. तर चालकासह दोघे जखमी. बुधवारी पहाटेची दुर्घटना.

Goa Accident News

पार उसगाव येथे अपघात, युवक जखमी

Usgao Accident

पार उसगाव येथे दुचाकीचा अपघात, मुरमुणे गुळेली येथील मोहीत महादेव नाईक हा युवक गंभीर जखमी. उपचारासाठी गोमेकॉत दाखल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT