Shashi Tharoor 
गोवा

Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's Breaking News 02 May 2024: गोव्यातील दिवसभरातील ठळक बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

Shashi Tharoor In Goa

या निवडणुकीत भाजपला धक्का बसेल, चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार असं दिसतंय. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानातून भाजपला धक्का बसेल असे वातावरण आहे. सध्या देशभरात प्रचार सुरु आहे, असे शशी थरुर म्हणाले.

अमित शहांची सभा, तानावडेंनी घेतला सभेच्या तयारीचा आढावा

Amit Shah Rally In Goa

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी म्हापसा येथे जाहीर सभा होत असून, या सभेच्या तयारीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी घेतला. सभेला 25 हजार लोक हजेरी लावण्याची शक्यता.

Amit Shah Rally In Goa

दिव्यांगांसाठीच्या मतदान केंद्रांची पहाणी

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ECI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आज दक्षिण गोव्यातील दिव्यांगासाठी प्रवेशयोग्य मतदान केंद्राची तपासणी केली. दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी रॅम्प, सुलभ शौचालय, वाहतूक, पिण्यासाठी पाणी आणि बूथवर प्रदान केल्या जाणाऱ्या निश्चित किमान सुविधांची उपलब्धता तपासणे हे तपासणीचे उद्दिष्ट होते.

Voting In Goa

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Amit Patkar

इव्हेंट मॅनेजमेंट भाजप सरकारकडे एप्रिल 2024 चे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. आज 2 मे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रचारात व्यस्त आहेत आणि सरकारी कर्मचारी तणावाखाली आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्वरित त्यांच्या खात्यात जमा करा, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

अमित शहांची शुक्रवारी गोव्यात सभा

Amit Shah In Goa

अमित शहा शुक्रवारी म्हापसा येथे जाहीर सभा घेणार आहेत. म्हापसा केटीसी बसस्थानकाजवळ होणाऱ्या या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Goa Congress

इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही दहावी घटनादुरुस्ती अधिक सक्षम करु, यामुळे पक्षांतराला चाप बसेल व किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील, असे काँग्रेस नेता पवन खेरा गोव्यात वक्तव्य केले.

Goa Congress

सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Truck At Mollem Catches Fire

कर्नाटकमधून गोव्यात येणाऱ्या मालवाहू ट्रक आगीत जळून खाक, जवळपास सहा लाखांचे नुकसान. वन खात्याच्या टँकरच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ट्रकसह त्यातील माल जळून खाक.

Truck At Mollem Catches Fire

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT