Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: संजीवनीच्या जागेत प्रस्तावीत आयआयटी शिक्षण प्रकल्प? भाटकारांना नोटीसा? स्थानीक राजकीय नेत्यांच्या लोकांना धमक्या?

Goa Today's Live News Update 29 June 2025: राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील ठळक घडामोडी.

Sameer Amunekar

संजीवनीच्या जागेत प्रस्तावीत आयआयटी शिक्षण प्रकल्प? भाटकारांना नोटीसा? स्थानीक राजकीय नेत्यांच्या लोकांना धमक्या?

संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत सरकारकडून प्रस्तावीत आयआयटी शिक्षण प्रकल्प आणण्याच्या हालचाली. बाजूच्या दोन जमिनदार भाटकरांना त्यांच्या जमिनींसाठी नोटीसा पाठविण्यात आल्याची सावर्डे गट काँग्रेसचे अध्यक्ष संकेत भंडारींची माहिती. संजीवनीच्या जागेत आयआयटी नको म्हूण स्थानिकांनी राज्यपाल आणि इतरांना दिले आहे सह्यांचे निवेदन. सावर्डे मतदारसंघातील एक राजकारणी निवेदनावर सह्या मारलेल्यांना धमकावत असल्याचा स्थानीक काँग्रेस नेत्यांचा गंभीर आरोप.

वडिलांना मुलींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याबद्दल २० वर्षांची शिक्षा

गोव्यातील बाल न्यायालयाने एका पुरूषाला त्याच्या एका मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल २० वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला ४.६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आणि ही रक्कम दोन्ही पीडितांना देण्याचे निर्देश दिले.

17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली; 19 वर्षीय युवकाला अटक

१७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली साळगाव पोलिसांनी सांगोल्डा येथील जोशुआ (१९) याला अटक केली आणि पीडितेची सोलापूर-महाराष्ट्र येथून सुटका केली.

दत्तवाडी साखळी येथील मूर्ती चोरांना जमीन मंजूर

दत्तवाडी साखळी मंदिरातून तीन पवित्र, अत्यंत प्राचीन आणि मौल्यवान मूर्ती चोरल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या धुळेर-म्हापसा येथील श्याम बालाजी बोडके आणि लामगाव-डिचोली येथील दिपेश कामत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कुडचडेत एलपीजी सिलेंडर गळतीमुळे आग; जीवितहानी नाही

कुडचडेमधील केंब्रिज शाळेसमोरील एका निवासस्थानात एलपीजी सिलेंडर गळतीमुळे आग लागली, ज्यामुळे १०,००० रुपयांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

२९ जून ते ५ जुलै दरम्यान राज्यात यलो अलर्ट

२९ जून ते ५ जुलै दरम्यान राज्यात मध्यम पावसासह आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे. १ जून ते २९ जून दरम्यान गोव्यात ३०.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यपालांनी राजभवन अन्नदान योजना राबवली; स्वतःच्या रॉयलिटी फंडातून स्ट्रीट प्रोव्हिडन्सला २.५ लाख रुपये दान केले

गोव्याच्या राज्यपालांनी राजभवन अन्नदान योजना राबवली ज्यामध्ये गव्हर्नर यांनी त्यांच्या स्वतःच्या रॉयलिटी फंडातून स्ट्रीट प्रोव्हिडन्सला २.५ लाख रुपये दान केले आणि आर्थिक ईदच्या वाटपांतर्गत डायलिसिस आणि कर्करोगाच्या रुग्णांना २५ हजार रुपये दान केले.

मागणीत वाढ; गणेशमूर्ती तयार करणारे कलाकार मिळणे कठीण

पाळी पंचायत क्षेत्रातील कुंभारवाडा येथे गणेश मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. मुख्य म्हणजे याठिकाणी चिकण माती पायाने मळणी करून नंतर मूर्ती तयार केल्या जातात. सध्या गणेश मूर्तीची मागणी वाढत असली तरी मूर्ती तयार करणारे कलाकार मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे भविष्यात गणेश मूर्ती करण्याबाबत कलाकार मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने चिकण मातीचे गणेश मूर्ती तयार करण्यासाठी नवीन कलाकार तयार करण्याची गरज असल्याची मागणी कलाकारांकडून होत आहे.

IFBB Championship भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या फोंड्यातील विदेश कवळेकर यांना ५ वे बक्षीस प्राप्त

दुबई येथे नुकत्याच झालेल्या IFBB चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे फोंड्याचे विदेश कवळेकर यांनी पाचवे स्थान पटकावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Quepem: केपेत स्कूटर चोरीला, अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल

केपे येथील झेल्डेम (Zeldem) येथील एका निवासस्थानाच्या मोकळ्या पार्किंग जागेतून एक स्कूटर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, केपे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: बेघरांसाठी गोव्यात नवी गृहनिर्माण योजना: मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

Bengaluru: बंगळूरुच्या बसस्थानकाजवळ जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ; दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल!

"30 तारखेला लग्न आणि नवरा पळाला, आता माझ्याशी लग्न कोण करणार?" चहलसोबत नात्याच्या चर्चांवर महवशची Post Viral

Pakistan: देशाला उद्धवस्त करणारा हल्ला होणार, ओसामा खानच्या भविष्यवाणीने पाकड्यांची उडाली झोप; एअरस्पेस केला बंद

SCROLL FOR NEXT