Sangolda Illegal Structure Demolition Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

Pramod Yadav

साडेपाच वर्षीय मुलीचा मृत्यू, खूनाचा गुन्हा नोंद

साडेपाच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी शवचिकित्सेनंतर खूनाचा गुन्हा नोंद. या प्रकरणी वास्को पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केला होता. वाडे-दाबोळीत निर्माणाधीन इमारतीजवळ पहाटे आढळला होता मुलीचा मृतदेह.

म्हापसा रोडरेज प्रकरण! पवन तिरके, राज साळगांवकर मुख्य सुत्रधार

म्हापसा येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या रोडरेज प्रकरणात फरार असलेले पवन तिरके आणि राज साळगांवकर हेच मुख्य सुत्रधार. जामिनावर सुटल्यानंतर ज्योवितो कुतिन्हो आणि एलरीच फर्नांडीस यांची माहिती.

कारापूर-सर्वणच्या सरपंचपदी तन्वी सावंत यांची बिनविरोध निवड

कारापूर-सर्वण पंचायतीत सत्ताबदल होताना सरपंचपदाची माळ अखेर तन्वी सावंत यांच्या गळ्यात पडली आहे. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या बैठकीत सावंत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

Gram Panchayat Karapur

गावणे-सत्तरीत अपघात, चालक जागीच ठार

गावणे-सत्तरीत दोन मिनी पिकअप ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात डिचोलीतील चालक आनंद चारी याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सांगोल्डा बेकायदेशीर बांधकाम कारवाई, एकजण गंभीर जखमी

सांगोल्डा येथे २२ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरु आहे. कारवाईवेळी एक व्यक्ती घरावरील साहित्य हटवत असताना खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपचे दोन्ही उमेदवार मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

गोव्यातील भाजपचे दोन्ही उमेदवार येत्या मंगळवारी (१६ एप्रिल) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता पल्लवी धेंपे आणि दुपारी १२.१५ वाजता श्रीपाद नाईक अर्ज दाखल करतील.

Goa BJP Candidate

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून महिला शटलर्सचे अभिनंदन

अश्विनी पोनप्पा यांच्यासह पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरल्याबद्दल गोव्याची आघाडीची बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टोचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन.

हुकूमशाही पोर्तुगीजांच्या विरोधात पहिली क्रांती घडवून आणणारे कुंकोळकार भाजपचा पराभव करण्यास सज्ज -अलेमाव

हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पहिली क्रांती कुंकळ्ळीकरांनी केली. गोव्याची अस्मिता टिकवून ठेवणारी ज्योत कुंकळ्ळीच्या सुपुत्राने प्रज्वलित केली.

कुंकोळकरांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नामांकीत इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना विजयी करुन हुकूमशाही भाजपचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे, अशी गर्जना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीत केली.

Goa Congress

बेकायदेशीर वृक्षतोड! कळंगुटचे आमदार मायकल लोबो RFO कार्यालयात दाखल

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवोली येथील रस्ता रूंदीकरणासाठी केलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो जबानी नोंदविण्यासाठी परिक्षेत्र वन कार्यालयात (RFO) दाखल.

LOBO In RFO

निर्माणाधीन इमारतीच्या जवळ सापडला पाच वर्षीय मुलीचा मृतदेह

निर्माणाधीन इमारतीच्या जवळ सापडला पाच वर्षीय मुलीचा मृतदेह. मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

सांगोल्डातील 22 बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा, तिघेजण ताब्यात!

सांगोल्डा कोमुनिदाद जागेतील 22 बांधकामे मोडण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. 22 पैकी एक घर केले जमीनदोस्त. पुढील कारवाई सुरू. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात.

Sangolda Demolition

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT