गोवा

Goa News Updates: दिवसभर रुद्रेश्वरचा मुद्दा गाजला; गोव्यातील विविध क्षेत्रातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today's Live News: गोव्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

भंडारी समाजाला तडजोड अमान्य!

भंडारी समाज आणि रुद्रेश्वर महाजनांना तडजोड अमान्य. हरवळेत समाज बांधवांच्या बैठकीत ठराव संमत. अन्य ४ ठरावही मंजूर.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ३३ वर्षीय युवकाला अटक

जुने गोवे (ओल्ड गोवा) पोलिसांनी सापळा रचून ३३ वर्षीय युवकाला ५२० ग्राम गांज्यासह रंगेहात पकडले. उपअधिक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुर्टी फोंडा येथील कृष्णा खडका (वय ३३) याला ५२,००० किंमतीच्या गांज्यासह अटक केली.

नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनली आणि त्याची पत्नी उषा यांची एक कोटी सहा लाखांची मालमत्ता जप्त

सराईत नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनली आणि त्याची पत्नी उषा यांची एक कोटी सहा लाखांची मालमत्ता जप्त. गोवा अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आलीय.

गोवा वाहतूक पोलिसांकडून मोबाईल ट्रॅफिक पेट्रोलिंग

गोवा वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर सुव्यवस्था आणि सुरक्षितता आणण्यासाठी मोबाईल ट्रॅफिक पेट्रोलिंगची अंमलबजावणी. तरुणांनी दुचाकी चालवताना वेगावर नियंत्रण तसेच हेल्मेट घालण्याचे आवाहन.

फोंडा अबकारी विभागाकडून 3742 लिटर देशी मद्यसाठा जप्त

फोंडा अबकारी विभागाकडून 3742 लिटर देशी मद्यसाठा जप्त, मद्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रकही जप्त.

वागातोर येथे 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

वागातोर येथे 21 वर्षीय तरुण योगेश त्रिपाठी याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिलटॉप क्लबच्या पार्किंग जागेत ही घटना घडली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रूद्रेश्वर देवस्थान पालखी विषयावर झालेली तडजोड आम्हाला मान्य नाही - अमित पालेकर

रविंद्र भवन येथील पत्रकार परिषदेत रूद्रेश्वर देवस्थान पालखी विषयावर झालेली तडजोड आम्हाला मान्य नाही. पूर्वी धर्मावर राजकारण चालायचे आता जातींवरुन राजकारण सुरु आहे. कालच्या विषयावर आज संध्याकाळी सर्व भंडारी समाजाचे बांधव हरवळेतील रूद्रेश्वर मंदिरात समितीला जाब विचारण्यासाठी एकत्रित येणार असल्याची अमित पालेकर यांची माहिती.

पेडण्यातील विकास माझ्यामुळेच, बाबू पुन्हा गरजले!

पेडण्यातील विकास माझ्यामुळेच. म्हणूनच मला तिथे लोकांनी चारवेळा संधी दिली. डॉ.प्रमोद सावंतानी मला आधार दिलाय.

मी त्यांना सोडणार नाही. पक्षाने सांगितल्यान पेडण्यात श्रीपाद भाऊंचा प्रचार आवश्य करेन. मुस्लीम समाजाची माझी स्वताची अशी मते आहेत. माजी मंत्री बाबु आजगांवकरांचे प्रतिपादन.

रोड रेजवरून पोलिसाला मारहाण; दोघांना अटक

रोड रेजवरून पोलिसाला मारहाण तसेच त्यांच्या तिघा मित्राला धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला. यातील दोघांना अटक केली असून इतर दोघे फरार आहेत. यातील एका संशयिताने या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केलेला.

अटक केलेल्यांमध्ये जोवित कुतीनो व एलरीच फर्नांडिस यांचा समावेश. तर पवन तिरके आणि राज नामक संशयित फरार.

Goa Crime News

उसगाव अपघात; जखमी झालेल्या सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू

Usgao Accident

उसगाव अपघातात जखमी झालेल्या सहा महिन्याच्या बालकाचा जीएमसीत उपचारा दरम्यान मृत्यू. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालविण्याप्रकरणी गुन्हा नोंद.

Goa News

गोव्यात 'ईद-उल-फित्र' अर्थात रमझान ईदचा उत्साहात

Ramzan Eid

गोव्यात 'ईद-उल-फित्र' अर्थात रमझान ईदचा उत्साह. डिचोलीत ऐतिहासिक 'निमुजगा'मध्ये झाली नमाज. शेकडो मुस्लिम बांधव सहभागी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT