112 year old Women casts her vote in goa
112 वर्षांच्या आजीबाईने लोकसभा निवडणुकीत केले मतदान. मुळगाव येथील हिराबाई नागेश परब या वयोवृद्ध महिलेने केला विक्रम. शिरोडवाडी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
Goa Voting Turnout
गोव्यात सायंकाळी वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मिळून 72.52 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 73.51 टक्के तर दक्षिणेत 71.55 टक्के मतदानाची नोंद.
Goa Voting Turnout
गोव्यात दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मिळून 61.39 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 61.28 टक्के तर दक्षिणेत 61.50 टक्के मतदानाची नोंद.
CM Pramod Sawant
मुख्यमंत्री प्रमोद सावंत दक्षिण गोव्यात दाखल झाले असून, त्यांनी आमदार दिगंबर कामत यांच्यासह दक्षिणेतील विविध मतदान केंद्रांना भेट दिल्या.
निवडणूक आयोगातर्फे मतदानाचा टक्का वाढवा यासाठी मतदारांना मतदार केंद्रावर शित पेयाची सोय केली. शितपेयांचे बॉक्स आणले पण ते थंड कशामध्ये करणार? असा प्रश्न केंद्रावरील अधिकाऱ्यांना पडला. मतदारांना नाईलाजास्तव शितपेयाच्या बाटल्या उष्णपेय म्हणून घ्याव्या लागल्या.
सत्तरी तालुक्यात मंत्री विश्वजीत राणेंचे एकतर्फी वर्चस्व कायम. जिथे बाबा (विश्वजीत) तिथे आम्ही. श्रीपाद भाऊंना मोठे मताधिक्य देऊ. सावर्डे पंचायतीच्या कुडशे बुथवरील युवकांचा निर्धार.
गोव्यात दोन्ही लोकसभा जागांसाठी दुपारपर्यंत एकूण 49.04 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 48.88 तर दक्षिणेत 49.20 मतदानाची नोंद.
Mala-Panaji
मळा-पणजी येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तब्बल ४५ मिनिटे मतदान प्रक्रिया थाबंली होती. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
Goa Total Voting Turnout Upto 11 AM
राज्यात दोन्ही मतदारसंघात सकाळी सात ते अकरापर्यंत एकूण 30.90 टक्के मतदान. उत्तेरत 30.31 तर दक्षिणेत 31.56 टक्के मतदानाची नोंद.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्नी सुलक्षणा सावंत यांचे कोठंबी साखळी येथील मतदान केंद्रावर मतदान. मतदानाचा वाढता कल हा विकसित भारतला मिळणारा प्रतिसाद असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सपत्नीक दोना पाऊला येथील प्राथमिक शाळेत बजावला मतदानाचा हक्क.
Total Vote Turnout Upto 9 AM In Goa
राज्यात दोन्ही मतदारसंघात सकाळी नऊपर्यंत एकूण 13.02 टक्के मतदान. उत्तेरत 12.80 तर दक्षिणेत 13.24 टक्के मतदानाची नोंद.
Bicholim Voting Center
डिचोली शहरातील एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात सुरवातीलाच बिघाड. सुमारे 27 मिनिटे मतदान प्रक्रिया रखडली. यंत्रातील दोष दूर केल्यानंतर मतदान सुरु.
Dempo Family Cast Vote
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ उमेदवार पल्लवी धेंपे, पती श्रीनिवास धेंपे आणि कन्या गिरिजा धेंपे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Goa Loksabha Election Voting
गोव्यात मतदानास सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रावर मतदार हजेरी लावत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.