Goa Daily News Wrap | Marathi Breakings 
गोवा

Goa Today's News Wrap: लोकसभेसाठी 19 अर्ज, लाईनमनचा मृत्यू! गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's Live News Update: गोव्यातील राजकारण, गुन्हे, क्रीडा, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

गोव्यातून लोकसभेसाठी 19 उमेदवारांचे अर्ज दाखल

गोव्यातून लोकसभेसाठी 19 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, उत्तरेतून 09 आणि दक्षिणेतून 10 उमेदरावांनी अर्ज दाखल केले आहेत. वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, 22 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

खलपांनी बजेट शिकून घ्यावं, ढवळीकरांच प्रत्युत्तर!

लाईनमन मनोज जांबावलीकरांच्या कुटूंबियांच्या दुख्खात मी सहभागी‌.माझ्या राजिनाम्याची मागणी करणाऱ्या उच्चशिक्षित आणि ६ वेळा आमदार झालेल्या रमाकांत खलपांनी खात्याला दिलं जाणारं बजेट आधी शिकून घ्यावं.

रेहबर खान खून प्रकरण; मुख्य संशयिताला अटक

पिळर्ण-पर्वरी येथे झालेल्या रेहबर खान खून प्रकरणी मुख्य संशयित विकास यादवला अटक. यापूर्वी याप्रकरणात पाच जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. हत्येनंतर विकास फरार झाला होता. रेहबरचा जखमी अवस्थेतील मृतदेह पर्वरी येथील ऑडीट भवनजवळ आढळून आला होता.

अन्सोळे-भिरोंडा जिलेटीन स्फोट प्रकरण; जमादारला न्यायालयीन कोठडी

अन्सोळे-भिरोंडा, सत्तरी येथील जिलेटीन स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी नासीर हसन जमादारला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

मंत्री ढवळीकर राजीनामा द्या, खलपांची मागणी!

2019 ते 2024 या काळात गोव्यात 71 माणसांचा आणि 30 जनावरांचा शॉकलागून मृत्यू. डिचोलीत आज शॉकलागून मरण पावलेल्या मनोज जांबावलीकरांच्या दुर्घटनेचे दुख्ख. वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी नैतिकता पाळून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. रमाकांत खलपांची मागणी.

कुंकळ्ळीत खूनाचा प्रयत्न, तिघांना अटक

कुंकळ्ळीत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रस्त्यावर मासळीचे पाणी पडल्याने झालेल्या वादातून फातर्पा येथील नागरिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.

विरियातो यांनी धर्माचा हिशोब मला देण्याची गरज नाही - सिक्वेरा

मी सुद्धा देवाला मानतो आणि चर्चमध्ये प्रार्थनासभेला जातो. लोकांची सेवा करणे हासुद्धा माझा एक धर्म आहे. त्‍यामुळे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी धर्माचा हिशोब मला देण्याची गरज नाही, आलेक्स सिक्वेरा यांचा पलटवार.

नारायण राणेंच्या रॅलीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वास्को-कुळे रेल्वे ६२ दिवस राहणार बंद

Vasco Collem Train Closure

वास्को ते कुळे (क्र. ०७३७९) आणि कुळे ते वास्को (क्र. ०७३८०) ही डेमू रेल्वे २० एप्रिलपासून ६२ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. लोहमार्गाच्या देखभालीसाठी ही रेल्वे बंद ठेवली जाईल. दरम्यान, वास्को ते कुळे (क्र. ०७३४३) आणि कुळे ते वास्को (क्र. ०७३४४) ही खास पॅसेंजर रेल्वे सांकवाळ येथे लोहमार्गाच्या तातडीच्या कामासाठी २० एप्रिल रोजी एक दिवसासाठी रद्द केली आहे.

डिचोलीत वीजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू!

व्हाळशी डिचोलीत वीज खांबावर दुरुस्ती करताना मनोज जांभावलीकर (रा.पिळगाव) या लाईनमनचा शॉकलागून मृत्यू.

बेंगळुरूचा पर्यटक दूधसागर धबधबा परिसरातून बेपत्ता

Tourist Missing In Goa

गोव्यात पत्नीसोबत पर्यटनासाठी आलेला बेंगळुरूचा पर्यटक गुरुवारी दुपारी दूधसागर धबधबा परिसरातून बेपत्ता झाला आहे. अब्दुल रफीक (६२) असे या पर्यटकाचे नाव असून, गुरुवारपासून कुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT