Goa Daily News Wrap | Marathi Breakings
Goa Daily News Wrap | Marathi Breakings 
गोवा

Goa Daily News Wrap: राजकारण, क्राईम, लोकसभा, पर्यटन विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

Pramod Yadav

चोर्ला घाटात 36 लाखांचे अवैध मद्य जप्त, दोघेजण ताब्यात

चोर्ला घाटात 36 लाखांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मडगावातून कर्नाटकात वाहतूक केली जात असताना, गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

हडफडे येथे मद्याच्या दुकानात चोरी, दीड लाख रुपये लंपास

Theft In Liquor Shop

हडफडे येथे मद्याच्या दुकानात चोरी झाली असून, दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

1.14 लाखांचा गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

1.14 लाखांचा गांजा बाळगल्याप्रकरणी पिसुर्ली-सत्तरी येथील प्रितेश गावडे याला अटक. प्रितेश गांजासह पाटो येथे आढळून आला.

कॅसिनोत 13 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशच्या एकाविरोधात गुन्हा

Cheating At Casino In Goa

कॅसिनोत 13 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्यप्रदेशच्या ब्रिजेश रायकवार विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'आप'ला संपवण्याचा भाजप-ईडीचा डाव फसला - वेंझी व्हिएगस

"आमचे नेते संजय सिंह यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. हुकूमशाही मोदी राजवटीने राजकीय हेतूंसाठी पीएमएलए कायद्याचे हत्यार बनवले आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो आणि 'आप'ला संपवण्याचा भाजप-ईडीचा डाव फसला."

- आप आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस

Venzy Veigas

कामुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मण नाईक बिनविरोध

कामुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मण नाईक यांची बिनविरोध निवड. मंत्री निळकंठ हळर्णकर, संगीता पेडणेकर, पांडुरंग खोर्जुवेकर, धर्मा परब यांची उपस्थिती.

Camurlim VP

मुख्यमंत्री सावंतांनी MGP च्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच केले संबोधित

लोकसभा प्रचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडकईत पहिल्यांदाच महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

वागातोर येथून केटीएमची चोरी हरमल येथे सापडली

KTM Theft From Vagator

वागातोर येथून चोरी झालेली रशियन नागरिकाची केटीएम ७९० दुचाकी हरमल येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करुन रशियन नागरिकाकडे सुपूर्द केली. पोलिस सध्या दुचाकी चोरट्याचा शोध घेत आहेत.

KTM Theft

कार्लुस आल्मेदांचा भाजपात प्रवेश

वास्कोचे माजी भाजप आमदार कार्लुस आल्मेदांची पुन्हा भाजपात घरवापसी. 2022ची विधानसभा निवडणूक लढवली होती काँग्रेसच्या तिकीटावर. आल्मेद यांचा आज (मंगळवारी) पणजीत समर्थक नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

Goa Today's Live News 02 April 2024 Update Breakings In Marathi

सेल्फीच्या नादात कार जळून खाक; तेलंगणाच्या पर्यटकांसोबत घडली ट्रेजेडी

Khola Beach Canacona

तेलंगणा येथील पर्यटकांसोबत एक विचित्र घटना घडली. पर्यटक सेल्फी घेण्यात गुंग असताना त्यांची पार्क केलेली कार पलटी होऊन जवळच्या दरीत कोसळली आणि जळून खाक झाली. काणकोण येथील खोला समुद्रकिनाऱ्याजवळ ही घटना घडली.

Khola Beach Canacona

आपचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे निधन

Dinesh Vaghela Died

आपचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला उर्फ बाबाजी यांचे निधन. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. गोव्यात पक्ष उभारणीसाठी त्यांनी सक्रियपणे काम केले आहे.

आज दुपारी ३.३० वाजता सांतिनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT