Goa Today's 29 April 2024 Live News Update 
गोवा

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's 29 April 2024 Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, लोकसभा प्रचार, गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

सांताक्रुज फोंड्यात अविनाश धनंजय नाईक (42) यांचा मामा कृष्णा सदाशिव नाईक (67) यांच्याकडून खून. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय. फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल. अधिक तपास सुरु.

उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार. उत्तरेतील वीसही मतदारसंघात भाजपला आघाडी मिळणार. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा विश्वास. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर व कार्यकर्त्यांसह डिचोली बाजार परिसरात प्रचार.

Goa Today's Live News Update

धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला अवजड वाहनाचा धक्का बसल्याने सहा वीजखांब कोसळले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग व परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. वीज कर्मचारी आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pernem

मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Hotel Sealed In Goa

मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेलवर सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांची दबंग स्टाइलने कारवाई. परवानगी न घेता सुरू असल्याने हॉटेल सील. ग्रामसभेत आणि पंचायत बैठकीत घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणी.

Madrem

लाच आणि खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Goa Crime News

लाच आणि खंडणी प्रकरणातील तिसरे आरोपी तेरेखोल पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरिक्षक विध्देश पिळगावकर यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांच्या जामिनावर उद्या संध्याकाळी होणार निर्णय

Margao Court

पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Taleigao VP Election

पणजी मी कधीच सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्नं पाहीली तरी ती पुरी होणार नाहीत. मला पक्षावर विश्वास आहे. ज्याच्याकडे लोक आहेत त्यालाच पक्षात किंमत. लोकमत असेल तरच पक्ष तिकीट देतो आणि माझ्याकडे लोकमत आहे हे आज पुन्हा सिद्ध. बाबुश मोन्सेरातांची प्रतिक्रिया

Taleigao VP Election

मोन्सेरात पॅनल विजयी

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलेचे सर्व उमेदवार विजयी.

ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मतमोजणीला सुरुवात

Taleigao Panchayat Election

ताळगाव पंचायत निवडणूकीच्या मतमोजणीला सुरवात. नियोजितवेळेपेक्षा 45 मिनिटे उशीरा मतमोजणी सुरू, रविवारी पंचायतीसाठी 68.79 टक्के मतदान झाले होते.

Taleigao Election

बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Theft In Bodgeshwar Temple Goa

म्हापसा येथील प्रसिद्ध जागृत श्रीदेव बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी. चार अज्ञात चोरांनी मंदिरमधील फंड पेटी फोडून पैशांवर मारला डल्ला. सुरक्षा रक्षकाला मंदिराच्या पाठीमागील बाजूला ओलीस ठेऊन केली चोरी. सोमवारी (ता. 29) मध्यरात्री दोन वाजताची घटना.

Bodgeshwar Temple Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT