PM Modi Rally
PM Modi Rally Dainik Gomantak
गोवा

Goa News Update: शनिवारी मोदींची सभा, काँग्रेसची तक्रार, गुन्हे; गोव्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

Pramod Yadav

सांकवाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा, सभास्थळाचा पोलिस अधीक्षकांकडून आढावा

दक्षिण गोवा गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी कुठ्ठाळी सांकवाळ बिर्ला येथे २७ एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभास्थळाचा आढावा घेतला.

यावेळी दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधिक्षक प्रबोध शिरवईकर, वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दाबोळी विमानतळ वाहतूक पोलिस निरीक्षक रोहन धामस्कर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या होणाऱ्या सभेचा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आढावा घेतला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांची खास सुरक्षा एसपीजी कमांडो सभेस्थळी दाखल झाले आहेत.

बोरीत ड्रग्स लागवडीचा पर्दाफाश, स्थानिक युवकाला अटक

Goa Drug Case

एएनसीच्या मोठ्या कारवाईत बोरीतील ड्रग्स लागवडीचा पर्दाफाश. मुख्य सुत्रधार बोरीच्या युवराज बोरकर (वय 31) ह्याला अटक. एकूण साडे आठ लाखांचा ड्रग्स जप्त.

Goa Drug Case

'वेदांता'ची खाण डिचोलीतील नक्कीच बंद पडणार

डिचोलीतील 'वेदांता'ची खाण नक्कीच बंद पडणार. खनिज वाहतूक करण्यासाठी रस्ताच नाही. 'ईसी' मिळवण्यासाठी 'वेदांता' कडून खोटा 'ईआयए' सादर केल्याचे स्पष्ट. सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा.

Goa Minning

सासष्टीत आठ लाखांचे मद्य जप्त

सासष्टीत अबकारी खात्याने 8,41,710 लाख किंमतीचे 3,346 लिटर मद्य आणि 25 लाखांचे वाहन असा, 33,41,710 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोवा काँग्रेसची पीएम मोदी, सीएम सावंत यांच्यासह आठ जणांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Complaint Against PM And CM

गोवा काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह आठ जणांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपचे सदस्य विरियातो यांच्या भाषणाबाबत चुकीची माहिती पसवरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

लाच आणि खंडणी प्रकरण! विध्देश पिळगांवकरांच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ

Goa Bribe Case

लाच आणि खंडणी प्रकरणात तिसरे आरोपी असलेले तेरेखोल पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विध्देश पिळगांवकर यांच्या पोलीस कोठडीत अजून 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या आधी त्यांना 5 दिवसाचा रिमांड देण्यात आला होता. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होईल.

पिकेन पेडे, हणजूण येथे आग; कापड दुकानासह दुचाकी जळून खाक

Fire In Anjuna

पिकेन पेडे, हणजूण येथे लागलेल्या आगीत कपड्याच्या दुकानासह दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डिचोली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर गाव गुंडाकडून लैंगिक अत्याचार

Sexual Assault Case In Goa

डिचोली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर गाव गुंडाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT