Velus Sattari accident Dainik Gomantak
गोवा

Goa News Update: मडगाव गूढ मृत्यू, अपघात, लोकसभा राजकारण; गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's 25 April 2024 Live News Update: लोकसभा निवडणूक, गुन्हे, राजकारण, क्रीडा, कला, संस्कृती यासह राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

सत्तरी वेळूस येथे दोन दुचाकींचा अपघात, एकजण जखमी

Velus Sattari accident

सत्तरी वेळूस येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Velus Sattari accident

आरजीच्या डेसमंड फर्नांडिस यांचा विरियातो यांना पाठिंबा

रिव्होल्युशनरी गोवन्सच्या डेसमंड फर्नांडिस यांचा इंडिया आघाडीचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना पाठिंबा. डेसमंड आरजीचे माजी उपाध्यक्ष पीटर फर्नांडिस यांचे भाऊ असून, त्यांनी बाणावलीतून विधानसभा लढवली निवडणूक होती.

लाच प्रकरण! पोलिस निरीक्षक विध्देश पिळगांवकर यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

लाच प्रकरणातील तिसरे आरोपी तेरेखोल पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विध्देश पिळगांवकर यांच्या जामिनावर उद्या (दि.२६ एप्रिल) सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सत्र न्यायालायात दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. विध्देश पिळगांवकर यांचा ५ दिवसांचा रिमांड उद्या संपतो. काल याच प्रकरणातील संजय तळकर आणि उदयराज कलंगुटकर यांची १ लाखाच्या जामिनावर सुटका झाली

भाजपाचे संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्याकडून लोकसभेच्या प्रचाराचा आढावा

भाजपाचे संघटन मंत्री बी. एल. संतोष यांनी लोकसभेच्या प्रचाराचा तसेच संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. भाजपाच्या पणजीतील कार्यालयात झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासहित इतर आमदार तसेच मंत्र्यांचीही उपस्थिती

मुख्यमंत्र्यांकडून आमदार देविया राणे यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्येच्या आमदार देविया राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

एक ते तीन मे दरम्यान उत्तर गोव्यात अमित शहांची प्रचारसभा

दक्षिण गोव्यात २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार असल्याची माहिती सदानंद तानावडे यांनी दिली. त्यानंतर एक ते तीन मे दरम्यान उत्तर गोव्यात अमित शहांची प्रचारसभा होईल अशी माहिती तानावडे यांनी दिली आहे.

डिचोली लाईमन मृत्यूप्रकरणी संबधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करा - काँग्रेस

दुरुस्ती काम करता असताना डिचोलीत वीज खात्याच्या लाईमनच्या मृत्यूप्रकरणी संबधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

डिचोलीत १९ एप्रिल रोजी दुरुस्ती काम करताना लाईनमन मनोज जांबावलीकर याचा मृत्यू झाला होता.

चिंचणी येथे आज विरियातो यांची सभा

काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची आज (गुरुवार) चिंचणी येथे जाहीर सभा होणार आहे. सावियो डिसिल्वा यांनी दक्षिणेतील नागरिकांना सभेला हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT