Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today's 20 May 2024 Marathi Breaking News: गोव्यातील राजकारण, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन भावना दुखावल्याप्रकरणी अटेकत असणाऱ्या श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीयय श्रेया यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रेया धारगळकर पुन्हा अडचणीत, लईराईच्या धोंड भक्तगणांबद्धल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा नोंद

श्रेया धारगळकर पुन्हा अडचणीत. शिरगावच्या श्री लईराईच्या धोंड भक्तगणांबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी श्रेया विरोधात डिचोली पोलिसात तक्रार. अटक करण्याची मागणी. संतप्त धोंड भक्तगणांची पोलिस स्थानकावर धडक.

FIR

आप बाणावलीची जिल्हा पंचायत निवडणूक लढणार - व्हेंझी

बाणावली जिल्हा पंचायत निवडणूक पुन्हा लढविण्याची आम आदमी पार्टीची तयारी. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचाराच्या तयारीला लागणार असल्याचे आपचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितलें.

कुर्टी-फोंड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, नऊ लाखांचे नुकसान

कुर्टी-फोंड्यात इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, वीजेचा झटका बसल्याने ही घटना घडली. यात नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सासष्टीत चोऱ्यांमध्ये वाढ! खुल्या पार्कींगमधून स्कुटर चोरीला

Goa Theft Case

मडगांव कदंबा बस स्टॅंडसमोरील खुल्या पार्कींगमधून GA.08.AS.8394 ही व्हेस्पा स्कुटर (मूल्य 1 लाख 68 हजार) चोरीला. अमिश कार्लेकरांकडून तक्रार नोंद.

मडगांव दामोदराच्या अंगावरील दागिने लांबविले

मडगांवचे जागृत दैवत देव दामोदराच्या सालातल्या मुर्तीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी. दुचाकीवरुन आलेल्या इसमाने दिवसा ढवळ्या लांबवले सुमारे एका लाखाचे दागिने. पोलिस तक्रार नोंद. तपास सुरू.

Damodar Sal

बाणावली जिल्हा पंचायतीचीसाठीची पोट निवडणूक जाहीर!

23 जून रोजी बाणावली जिल्हा पंचायतीसाठीची पोट निवडणूक. आपचे जिल्हा पंचायत सदस्य हेंझल फर्नांडीस अपात्र ठरल्याने होतेय पोट निवडणूक

मृत कामगाराच्या कुटुंबियांना भरपाई द्या

डेक्कन फाईन केमिकल्स कारखाना, खोर्ली येथे अपघातात मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी. कारखान्याबाहेर कामगार एकवटले.

कोकण रेल्वेचे करमळी येथे लेक व्ह्यू रेस्टॉरंट; मडगावात रेंट बाईक सुविधा

Konkan Railway

करमळी कोकण रेल्वे स्थानकावर लेक व्ह्यू रेस्टॉरंट सुरू करणार. मडगाव आणि कोकण रेल्वेच्या इतर महत्त्वाच्या स्थानकांवर रेंट बाईक सुविधा देणार असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती.

समुद्रात अडकून पडलेल्या 24 पर्यटकांना वाचविण्यात कोस्ट गार्डच्या जवानांना यश

मुरगावजवळ पर्यटक बोटीत अडकून पडलेल्या 24 पर्यटकांना वाचविण्यात भारतीय कोस्ट गार्डच्या जवानांना यश आले आहे.

कला अकादमीचे ऑडिट करा - गोवा फॉरवर्ड

Kala Academy

कला अकादमीचे चार्ल्स कुरय्या फाऊंडेशनच्या मार्फत ऑडिट करावी अशी मागणी गोवा फॉरवर्डच्या वतीने करण्यात आली आहे.

क्रेनचा दोर तुडला अन् कामगाराने जीव गमावला

Usgao Crane Accident

उसगाव येथे सॉमिलमध्ये क्रेनचा दोर तुटल्याने झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला आहे. बुजवल सिंग असे मृत कामगाराचे नाव असून, लाकडाचे ओंडके खाली करताना ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT