Goa Top News Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: उसगावात दोन अपघात, पर्वरी उड्डाणपूल, कुळे येथील आग; गोव्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

Amboli Ghat: आंबोली घाटात पर्यटकांमध्ये हाणामारी

कोल्हापूरमधून कोकणात जाणाऱ्या आंबोली घाटात पर्यटकांमध्ये हाणामारी. काहीतरी किरकोळ कारणावरुन या प्रवाशांमध्ये वाद होवून त्याचं पर्यावसन पुढे हाणामारीत झाले.

Goa Theft Case: सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या दोघांना अटक

कांदोळी येथील तरुणाकडून नोव्हेंबरमध्ये मोबाईल व सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी पंकज माथूर आणि राजन खवास (29, दोघेही मूळ पश्चिम बंगाल) या दोघांना आज अटक. म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी.

Usgao Accident: उसगाव येथे टेम्पो आणि दुचाकीमध्ये अपघात

उसगाव येथील एमआरएफ कंपनी समोर टेम्पो आणि दुचाकीमध्ये अपघात. दुचाकी टेम्पो खाली. वाघोण येथील दुचाकी चालकासह एकजण किरकोळ जखमी.

Goa Hit And Run Case: उसगाव हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रक चालकाला अटक

उसगाव हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. नेस्ले कंपनीजवळ झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. फोंडा पोलिसांनी चालकाला अटक केली असून, ट्रक देखील जप्त केला आहे.

Mapusa Assault Case: देवडी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - जोशुआ

म्हापसा प्राणघातक हल्ला प्रकरणातील पीडित अहमद देवडीवर अंत्यसंस्कार, अंत्यसंस्काराला शेकडो लोकांची हजेरी.

पोलिस मुख्य आरोपीला अटक करून न्याय मिळवून देतील, अशी वडिलांची अपेक्षा. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी अहमद देवडी यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले, तसेच फरार आरोपींना शोधून देवडी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन.

पंचायत आमदारांच्या हातातून निसटली...!

मये मतदारसंघातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंचपदी दिव्या नाईक. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड.

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाणपूल ऑन होल्ड

आमदार रोहन खंवटे यांनी अधिकाऱ्यांसोबत पर्वरी येथे होणाऱ्या उड्डाणपुलाची पहाणी केली आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय नसल्याचे समजल्यावर सामान्य नागरीकांना त्रास होणार नाही याची खातरजमा केल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार झाल्यावरच कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.

UGC NET रद्द झाल्यावरुन खासदार विरियातो फर्नांडिस यांची मोदींवर टीका

भारतातील शैक्षणिक व्यवस्थेचे पावित्र्य सध्याचे 56 इंच छातीवाले (04 जूनला पंक्चर झाल्यापासून) आणि त्यांचे उद्योजक मित्र, आपले विद्यार्थी आणि देशाचे भविष्य धोक्यात आणत आहेत. काँग्रेस या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच लढेल.

Dengue Cases In Sattari: सत्तरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

सत्तरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. उपाय म्हणून वाळपई सरकारी आरोग्य केंद्रातर्फे विविध भागात फवारणी तसेच डेंग्यू संबंधी जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवरायांना अभिवादन..!

डिचोलीत गुरुवारी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान आणि विविध संघटनांकडून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर जल आणि दुग्धाभिषेक.

Goa Fire News: कुळे येथील जनरल स्टोअर्सला आग, चार लाखाचे नुकसान

कुळे येथील यादेंद्र कवळेकर यांच्या मालकीच्या 'कवळेकर जनरल स्टोअर्सला' रात्री आग. दुकानातील सामान जळुन खाक. कुडचडे अग्नीशामक दलांनी विझवली आग. चार लाखाचे नुकसान. शॉट सर्कीट मुळे आग लागण्याची शक्यता. कुळे पोलीस कडुन तपास चालु.

Goa Fire Case
Goa Fire Case

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT