Goa Daily Update Dainik Gomantak
गोवा

Goa Daily Update: अवकाळीची हजेरी, पणजीत दाणादाण, तेरेखोल येथे खून; गोव्यातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Goa Live News Update: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या क्रीडा, गुन्हे, राजकारण, पर्यटन, कला यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

अमित शहांची 24 एप्रिल रोजी म्हापशात जाहीर सभा

गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिल रोजी म्हापशात जाहीर सभेला संबोधित करतील. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हापसा बसस्थानक गांधी चौक येथे शहांची सभा होईल.

ताळगाव पंचायत निवडणूक; चारजण बिनविरोध

ताळगाव पंचायत निवडणुकीत चारजण बिनविरोध निवडून आले आहेत.

वार्ड १ - सिद्धी राजेंद्र केरकर

वार्ड ४ - ईस्टेला ईस्टेवान डिसुझा

वार्ड १० - सागर रमेश बांदेकर

वार्ड ११ - सिडने पाऊलो बर्रेटो

न्हयबाग-पोरस्कडे येथे वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारा ट्रक पलटी

Goa Accident

राष्ट्रीय महामार्गावर न्हयबाग-पोरस्कडे येथे वैद्यकीय साहित्य (सलाईन वॉटर) घेऊन जाणारा ट्रक पलटी. ट्रक चालक जखमी. उपचारासाठी इस्पितळात दाखल. ट्रक साहित्य घेऊन गोव्यातून महाराष्ट्रात जात होता.

Goa Accident

लाच प्रकरण! पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकरला एसीबीकडून अटक

Goa Crime

लाच प्रकरणी तेरेखोल किनारपट्टी स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकर यांना आज एसीबीकडून अटक. आतापर्यंत याप्रकरणी तिघा जणांना अटक. यापूर्वी संजय तळकर व उदयराज उर्फ राजू कळंगुटकर यांना अटक झाली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर येत्या 22 रोजी सुनावणी होणार आहे

चिखल काला नाही हो, चिखल झाला!

Panaji Rain

पणजी शहरात आज पहिल्याच पावसात सगळीकडे भाजप, नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतचे चिखलमय दर्शन घडले. गोवा भाजपच्या स्मार्ट सिटीचे अभिनंदन! हाच तो कोटी कोटींची उढळपट्टी करुन केलेला भाजपचा विकास, रमाकांत खलप यांचे ट्विट.

अजून किती बळी?

डिचोलीत दुरुस्तीकाम करताना विजेचा शॉक बसल्याने लाईनमनचा मृत्यू झाला. घटनेला एक दिवस उलटला नसताना शिवोलीत एक लाईनमन जीव धोक्यात घालून काम करताना दिसून आला. सुरक्षात्मक काळजी न घेता काम करणाऱ्या लाईनमनचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल.

गोव्यात आणखी एक खून? तेरेखोल नदीत आढळला मृतदेह

Murder In Pernem

पेडण्यातील तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळला असून, खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु.

स्मार्ट सिटीचा विकास पाहायला नागरिकांना घेऊन या - पाटकर

विकसित भारत योजनेंतर्गत निर्माण होत असलेल्या स्मार्ट सिटीचे काम पाहण्यासाठी कंदब बसच्या मदतीने काणकोण, पेडणे, मुरगाव आणि मोले येथील नागरिकांना पणजीत घेऊन या, अशी खोचक टीका अमित पाटकर यांनी गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर केली आहे.

पाटकर यांनी पणजीत झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती भागात साचलेल्या पाण्याचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

रेहबर खान खून प्रकरण; विकासला पोलिस रिमांड

Goa Murder Case

पिळर्ण-पर्वरी येथे रेहबर खान (22, उत्तरप्रदेध) याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित विकास यादव (22, कांदोळी) याला पाच दिवसांचा पोलिस रिमांड. या खून प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक झालीय.

Goa Live News Update | Crime News

नभं उतरु आलं... गोव्यात अवकाळीची हजेरी

Goa Live News Update | IMD Rain News

गोव्यात आज सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. राजधानी पणजीसह डिचोली, सांगे, कुडचडे, सत्तरीत पावसाच्या सरी बरसल्या. पणजीतील काही भागात पाणी साचले असून, वीज पुरवठा खंडित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT