गोवा

Goa Today's News: व्यंकटेश नाईक यांची ढवळी अर्बन कॉ-ओपरेवटीव्ह अध्यक्षपदी

Goa Today's 18 July 2023 News Live update: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ताज्या घडामोठीचा आढावा.

Pramod Yadav

व्यंकटेश नाईक यांची ढवळी अर्बन कॉ-ओपरेवटीव्ह अध्यक्षपदी!

व्यंकटेश (दादा) नाईक यांची तिसऱ्यांदा ढवळी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदी मशाल आडपईकर, विनायक नाईक यांची सचिवपदी तर संदीप ढवळीकर यांची खजिनदारपदी निवड.

BSNL ने केबलसाठी खोदलेल्या चरीमुळे धामशेतील रस्ता खचला!

धामशे, सत्तरी येथे BSNLने केबलसाठी खोदलेल्या चरीमुळे धामशे गतिरोधक ते पूलापर्यंतचा 800 मीटर रस्ता खचला. असाच पाऊस सुरु राहिल्यास पूर्ण रस्ता खचण्याची शक्यता आहे.

अनमोड घाट वाहतूकीसाठी खुला

मोले-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. अनमोड घाटावर दूधसागर देवालयाच्या परिसरात सकाळी (18 जुलै) दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला होता.

Goa DGP Alok Kumar: गोव्याचे नवे डीजीपी अलोक कुमार यांच्याकडून कळंगुट पोलिसांचे अभिनंदन!

गोव्याचे नूतन डीजीपी अलोक कुमार यांनी कांदोळी खून प्रकरणाचा 36 तासांत छडा लावल्याबद्दल कळंगुट पोलिसांचे अभिनंदन केले.

Goa Crime News: कांदोळी खूनप्रकरण, आरोपीस 8 दिवसांची पोलिस कोठडी

म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून कांदोळी खूनप्रकरणी आरोपी अरविंद राजू पवारला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरनॅाल्ड सुआरिस यांच्या खूनाच्या आरोपाखाली पवारला अटक केली होती.

Mapusa Accident: म्हापशामध्ये तीन वाहनांमध्ये धडक; एकजण गंभीर जखमी

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. म्हापसा येथील अंकुर हॉस्पिटलसमोरील डांगी कॉलनी येथे तीन वाहनांमध्ये धडक झाली. या अपघातात एकजण गंभीर जखली झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

Ragada River: साकोर्डा मधलावाडा बोळकर्ण रस्ता पाण्याखाली

रगाडा नदीला पूर आल्याने साकोर्डा मधलवाडा-बोळकर्ण रस्ता पाण्याखाली गेला. तसेच, देऊळमळ पूलावरुन पाणी वाहत असून बोळकर्ण तांबडी सुर्ला आणि गुळेली वाळपाई मार्ग जाणारी वाहतूक बंद करण्यात आलीय.

Bicholim News: डिचोलीत कचऱ्याचा प्रश्न पेटला..!

ऐन पावसात डिचोलीत कचऱ्याचा प्रश्न पेटला. रोलिंगमिल परिसरात पुन्हा कचऱ्याची दुर्गंधी. सरकारने या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्थानिकांनी दिलाय.

Red Alert In Goa: गोव्यात दोन दिवस 'रेड अलर्ट', शनिवारपासून ऑरेंज अलर्ट

गोवा हवामान खात्याने राज्यात दोन दिवस (आज, उद्या) रेड अलर्ट जारी केला असून, शनिवारपासून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दाबोळीवरुन मोपाला विमानसेवा स्थलांतर, विरोधीपक्षनेते आलेमाव यांची आज लक्षवेधी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दाबोळी विमानतळावरुन विमानसेवा मोपाला हलवल्यामुळे दक्षिण गोव्याच्या अर्थव्यवस्थेला होणारा धोका यावर लक्षवेधी सुचना मांडली आहे. सभापतींनी ती कामकाजात दाखल करुन त्यावर आज सभागृहात चर्चा होईल.

जोगीवाडा, डिचोलीत झाड कोसळल्याने घराचे नुकसान

डिचोलीत घरावर झाड कोसळले. शहरातील जोगीवाडा येथील महिलेच्या घरावर झाड कोसळले. आर्थिक हानी वगळता मातेसह मुलगा सुरक्षित. घराची मोडतोड. मुलासह महिलेचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. बुधवारी रात्रीची घटना.

आमरखणे, केरीत संरक्षक भिंत कोसळली रस्ताही खचला

आमरखणे, केरी, फोंडा येथे संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ताही खचला. मुसळधार पावसाने अर्धा रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठी धोका निर्माण झालाय.

Mollem Belgavi Highway: मोले ते बेळगाव राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस बंद

अनमोड घाटावर दुधसागर देवालयाच्या परीसरात सकाळी दरड कोसळली. मोले ते बेळगाव राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस बंद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT