गोवा

Goa News Update: काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल, मयेची यात्रा, पर्वरीत खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

Goa Today's 17 April 2024 Live News Update: राज्यात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

मुख्यमंत्री सावंत बेळगावात, शेट्टर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या बेळगाव येथे असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

रेडीघाट रस्त्यावर मिनी टेम्पोचा अपघात, चालक जखमी

रेडीघाट रस्त्यावर मिनी टेम्पोचा अपघात झाला असून, यात चालक जखमी झाला आहे.

Redighat Accident

कामत घाबरट तर ढवळीकर गोव्याच्या राजकारणातील सरडा - सरदेसाई

दिगंबर कामत घाबरट आहेत, त्यामुळे ते गोमन्तकीयांपासून पळ काढतायेत. सुदिन ढवळीकर गोव्याच्या राजकारणातील सरडा, त्यांचे मंत्रीपद सुरक्षित नसून लोकसभेनंतर त्यांची हकालपट्टी केली जाईल. मंत्रीपद वाचविण्यासाठी ढवळीकर भाजपने दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत, विजय सरदेसाई यांची कामत आणि ढवळीकरांवर जहरी टीका.

उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या रमाकांत खलप यांचा अर्ज दाखल

उत्तर गोव्यातून काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यावेळी युरी आलेमाव, अमित पाटकर, अमित पालेकर आणि कार्लुस फेरेरा उपस्थित होते.

ramakant khalap Files Nomination

लोकसभा निवडणुकीत जनशक्तीचा विजय होईल - आलेमाव

या लोकसभा निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा मुकाबला होईल, आणि यात निश्चितच जनशक्तीचा विजय होईल.

विरियातो यांचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित 

विरियातो यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस उपस्थित होते.

Viriato Fernandes Files Nomination

वीज वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्या म्हैशी

Sattari

पेळावदा रावण सत्तरी येथे भूमिगत वीज वाहिनी खोदाई चरात दोन म्हशी पडल्या. गावकऱ्यांच्या प्रयत्नाने म्हशींना सुखरूप बाहेर काढण्यात यश. वीज अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा उघड

Sattari

अखेर मयेतील 'माल्या'ची जत्रा उत्साहात

Mayem Yatra

मयेवासियांसह हजारो भाविकांची प्रतीक्षा अखेर संपली. मयेतील 'माल्या'ची जत्रा उत्साहात. जत्रेचे वैशिष्ट्य असलेले 'माले' पेटले, अन् देवीचा 'पण'ही पूर्ण.

Mayem Yatra

पिळर्ण खून प्रकरणात लव्ह ट्रँगल?

Goa Murder Case

Goa Murder Case

लव्ह ट्रँगलमधून रेहबर खान (21, अमरोहा, युपी) याचा खून झाल्याची त्याच्या चुलत भावाची माहिती. सलूनमध्ये काम करणाऱ्या रेहबरचा पिळर्ण-पर्वरी ऑडिट भवनजवळ आढळला होता मृतदेह. प्रेमप्रकरणातून रेहबरला मारहाण झाली असून, संशयिताला अटक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT